महिलांना त्रास देणाऱ्या कंपनीला मनसेचा दणका, मॅनेजरला दिला चोप
पुणे येथील प्रभा इंजिनिअरिंग कंपनीमध्ये महिलांना गलिच्छ वागणूक देण्यात येत होती. महिला कर्मचाऱ्यांना वॉशमशरूमला जाताना देखील लेटर लिहून द्यावं लागत होतं. या सर्व प्रकारामुळे महिलांनी कंपनीच्या जाचाला वैतागून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे तक्रार केली. या संतप्त प्रकारामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी संतापले.
मनसे माथाडी कामगार अध्यक्ष निलेश माझिरे यांच्यासह मनसैनिक कंपनीला जाब विचारण्यासाठी प्रभा इंजिनिअरिंग कंपनीमध्ये गेले. त्या ठिकाणी गेल्यानंतर कंपनीच्या मॅनेजरला जाब विचारत चोप देण्यात आला. आपण महिलांना अशी वागणूक दिल्याचे कंपनीच्या मॅनेजरने कबूल केले. या सदर प्रकाराबाबत पौंड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
अशाप्रकारे कुठल्या कंपनीने महिलांना वागणूक दिली तर मनसे स्टाईलने प्रत्युत्तर दिले जाईल असे देखील मनसे माथाडी कामगार अध्यक्ष निलेश माझिरे म्हणाले. कर्मचाऱ्यांची पिळवणूक होत असलेल्या घटना नवीन नाहीत. कामगारांना गुलामासारखी वागणूक बऱ्याच कंपन्या देत आहे. 8 तास म्हणून कर्मचाऱ्यांकडून बारा बारा तास काम करून घेत आहेत. मनसेच्या या दणक्याने कर्मचारी वर्गाला त्रास देताना कंपन्या विचार करतील एवढं मात्र नक्की.
कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांना कमी पगारामध्ये अक्षरशा गुलाबासारखी वागणूक देत आहेत. काही इमर्जन्सी असेल, कुणाला प्रकृतीचे काही कारण असेल तरीदेखील सुट्टी दिली जात नाही. कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना घृणास्पद वागणूक देणे कुठेतरी थांबणे गरजेचं आहे. त्यांनाही मन आहे, कुटुंब आहे. त्यांनाही वेदना असतात हे जाणून घेणं गरजेचं आहे, नाहीतर मग अशा मनसेसारखे पक्ष तुमची गैर करणार नाहीत.
हेही वाचा: येणाऱ्या महानगरपालिका निवडणूकांमध्ये मनसेच्या कामाची पावती लोक देतील, कारण..
मनसैनिकांनो तुमच्यासाठी गोड बातमी, रुपाली ठोंबरे पक्ष सोडणार नाहीत म्हणाल्या; मनसे तर..
शरद पवारांनी रोहित पवारांना जिल्हा परिषद सदस्य केले पण अध्यक्ष केले नाही पण रामराजेंनी पुतण्याला..
धक्कादायक..! देवेंद्र फडणवीस यांचीच एसटी कर्मचाऱ्यांची वाट लावली; फडणवीसच सर्वस्वी जबाबदार
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम