Nawab Malik: बिजेपीचा ‘बॉम्ब’ निघाला फुसका! आर्यन खान ‘ड्रग्स’ प्रकरणाचा मास्टरमाईंड सुनील पाटील निघाला बीजेपीचा मोहरा

0

आर्यन खान ड्रग्स प्रकरणात नवनवीन हेवेदावे सुरू असताना काल भाजपचा कार्यकर्ता मोहित कंबोजने ‘सुनील पाटील’ हा या प्रकरणाचा ‘मास्टरमाइंड’ असल्याचं सांगितलं, आणि एकच खळबळ उडाली. ‘मोहित कंबोज’ यांनी अनेक धक्कादायक खुलासे केल्यानंतर,सात-आठ महिन्यांपासून सुनील पाटील यांच्या बरोबर असणाऱ्या ‘विजय पगारें’नीही पैशासाठीच आर्यन खानला जाणीवपूर्वक अडकवलं असल्याचा धक्कादायक खुलासा केला, आणि या प्रकरणात पुन्हा वादळ निर्माण झाले.

मोहित कंबोज यांनी सुनील पाटील हा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता असून त्याच्या सांगण्यावरून या प्रकरणात कटकारस्थान रचले गेले आहे. या प्रकरणाचा मास्टरमाइंड हा सुनील पाटीलच असल्याचा मोठा खुलासा मोहित कंबोज यांनी काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला. सुनील पाटील यांचे काही फोटो देखील माध्यमांसमोर दाखवले एवढेच नाही तर, ‘सॅम डिसूजा’ बरोबर त्याचं बोलणंही झालं होतं, हे देखील त्यांनी माध्यमांना पुराव्यानीशी सांगितलं. मोहित कंबोज यांनी अनेक धक्कादायक खुलासे केल्यानंतर विजय पगारे यांची या प्रकरणात एन्ट्री झाली. आणि अनेक शंका-कुशंका पुन्हा उपस्थित झाल्या.

विजय पगारे आणि मोहित कंबोज यांनी मीडियाशी साधलेल्या संवादानुसार सुनील पाटील हा या प्रकरणाचा मास्टरमाइंड असल्याचं प्रथमदर्शनी वाटत आहे. मात्र सुनील पाटील हा नक्की कोणाचा कार्यकर्ता आहे? आणि या कटात कोण कोण सामील होतं? या प्रश्नाचे उत्तर अद्याप मिळू शकलेले नाही, यासाठी आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. मोहित कंबोज यांनी सुनील पाटील हा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता असल्याचं सांगितलं असून त्याचे राष्टवादीच्या अनेक मोठ्या नेत्यांशी कौटुंबिक संबंध आहेत. त्याचबरोबर अनेक मोठ्या अधिकाऱ्यांच्या बदल्या देखील त्याच्या सांगण्यावरून होत असल्याचा दावा मोहित कंबोज यांनी काल केला.

मात्र दुसरीकडे सुनील पाटील याचे अनेक व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. एका व्हिडिओत अमित शहांच्या पाया पडतानाचा व्हिडिओ देखील सुनील पाटील यांचा सोशल मीडियावर पाहिला मिळाला. त्याचबरोबर बीजेपीचा कार्यकर्ता मनीष भानुशालींच्या बरोबरचे फोटो देखील समोर आल्याने, सुनील पाटील हा नक्की कोणाशी संबंधित आहे? कोणाच्या सांगण्यावरून हे प्रकरण घडवून आणलं? अशा असंख्य प्रश्नाची उत्तरे आज नवाब मलिक यांच्या पत्रकार परिषदेत मिळू शकतील का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

आर्यन खान ड्रग्स प्रकरणाचा मास्टर माईंड म्हणून आरोप होत असणारा सुनील पाटील सध्या कुठे आहे? धुळ्यामध्ये असणारं त्याच्या अलिशान घराला देखील कुलूप लावले आहे. गेल्या चार-पाच महिन्यांपासून वीजबिलही थकीत असल्याची माहिती समोर आली आहे. आता तो कुठेतरी लंपास झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. भाजपचे नेते आशिष शेलार यांनी तर सुनील पाटील यांना राष्टवादीनेच लपवून ठेवल्याचा गंभीर आरोप केला आहे.

सत्तावीस सप्टेंबरला मनिष भानुशाली, किरण गोसावी, आणि सुनील पाटील एमएच१२ इनोवा ३००० क्रमांकाच्या गाडीने अहमदाबादला निघाले. अहमदाबादला निघण्यापूर्वी ते फॉर्च्यून हॉटेलमध्ये दोन रुम्स बुक करून काही काळ थांबले, असल्याचे विजय पगारे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. मनिष भानुशाही एका जाड्या महिलेला तीन तास रूममध्ये नेउन काहीतरी चर्चा करत होता. चर्चा करून बाहेर आल्यानंतर तो सुनील पाटील यांना म्हणाला, “भाऊ बडा गेम हो गया” आपल्याला अहमदाबादला निघायचंय. त्यांच्यामध्ये एवढा बोलणं झालं, आणि ते आमदाबादला निघाले. असा खुलासा विजय पगारे यांनी काल केला.

योगायोग म्हणजे काल, मनीष भानुशाली, सुनील पाटील किरण गोसावी या तिघांचा फोटो, भाजपचे गुजरातचे मंत्री किरीट सिंह राणांसोबत असणारा फोटो व्हायरलही झाला. या प्रकरणामुळे सुनील पाटील याचा भाजपशी देखील संबंध असल्याचे समोर येत असल्याने, तो नक्की राष्ट्रवादीशी की भाजपशी संबंधित आहे. या महत्त्वाच्या प्रश्नांचा उलगडा नवाब मलिक आज पत्रकार परिषदेत करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.