मोठी बातमी! जात प्रमाणपत्रारावरून समीर वानखेडेच्या अडचणीत होणार वाढ, धनंजय मुंडे म्हणाले..
आर्यन खान ड्रग केस पासून चर्चेत आलेले एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्याबद्दल रोज नवनवीन माहिती सामोर येताना पाहायला मिळत आहे. त्यांच्यावर अनेक आरोप केले गेले आहेत. राजकीय क्षेत्रातून सुद्धा देखील त्यांच्यावर गंभीर आरोप केले गेले आहेत. नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी वानखेडेंवर अनेक गंभीर आरोप केले आहेत.
त्यामूळे अधिकारी समीर वानखेडे यांच्या अडचणीत वाढ होण्याची दाट शक्यता आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी देखील वानखेडे यांच्या संदर्भातील एक महत्वाचं विधान केले आहे. वानखेडेंच्या जात प्रमाणपत्राबाबतीत जर कोणी तक्रार दाखल करुन आक्षेप घेतला तर सामाजिक न्याय मंत्रालयाच्या वतीने समीर वानखेडेंची चौकशी करण्यात येईल असे मुंडे यांनी वकत्व केले आहे. धनंजय मुंडेच्या यांच्या खात्याअंतर्गत येणाऱ्या सामाजिक न्याय मंत्रालयाकडून याबाबत तपासाचे संकेतच दिल्याचे या वक्तव्यातून जाणवत आहे.
पुण्यामध्ये शनिवारी पत्रकारांशी संवाद साधताना धनंजय मुंडे म्हणाले , “समीर वानखेडे यांच्या जातप्रमाणपत्राच्या वैधतेबद्दल कोणी आक्षेप घेतला, तर सामाजिक न्याय विभागाकडे तक्रार दाखल केली तर या प्रकरणाची चौकशी करु,” असं मुंडे यांनी स्पष्ट केले आहे.वानखेडे यांच्यावर ते मुस्लीम असून त्यांनी मुस्लीम असल्याचं लपवत खोट्या कागदपत्रांच्या साह्याने इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिसेसमध्ये नोकरी मिळवली आहे असाही आरोप त्यांच्यावर झाला आहे. यावरुनच मुंडे यांनी आपण कारवाई करण्यास तयार आहोत असा इशाराच दिला आहे.
याच मुद्द्यावरून भाजपाचे विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी महाविकास आघाडीने जनतेचे प्रश्न सोडून केवळ समीर वानखेडेंना टार्गेट केले आहे. केवळ त्यांच्यावर हल्ला केला जात आहे अशी टीका केली. “राज्याच्या सामाजिक न्याय विभागात तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर तपास करण्याचे हक्क आहेत. सध्या समीर वानखेडे हेच या सरकारचा एकमेव महत्त्वाचा मुद्दा आहेत.समीर वानखेडे हे काही आमच्या पक्षाचे कार्यकर्ते नाहीत किंवा कोणत्याही भाजपा नेत्याचे नातेवाईक देखील नाहीत. ड्रग्ज सारखा बेकायदेशीर व्यवसाय केला जात आहे आणि अशी चुकीची कामे करणाऱ्या लोकांच्या विरोधात जर कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्याला लक्ष्य करणं हे पुर्णपणे चुकीचे आहे” असं दरेकर म्हणाले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी आर्यन खान प्रकरणानंतर एनसीबीसह भाजपावर सडकून टीका केली. विरोधी पक्षाने देखील टीकेला प्रतिउत्तर दिले आहे.भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नवाब मलिक यांच्यासारखे लोक मी खिशात ठेवतो, असं वक्तव्य केलं. याच वक्तव्याला मुंडे यांनी प्रतिउत्तर दिलंय. अश्या प्रकारची भाषा चंद्रकांत पाटलांना शोभत नाही, असं मत धनंजय मुंडे यांनी व्यक्त केलं. ते बीडमध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. भाजपाच्या कोणत्याच राज्य किंवा केंद्रातील नेत्यांचे खिसे येवढे मोठे नाहीत. प्रत्येकाने आपली मर्यादा ठेवून बोलायला पाहिजे,” असं मुंडेंनी म्हटलं आहे.
आर्यन खान प्रकरणानंतर अता हे समीर वानखेडे प्रकरण महाराष्ट्राच्या राजकारणात रंगताना दिसतं आहे. पण सर्व राजकारणामध्ये राजकारणाशी संबंध नसलेले एनसीबी अधिकारी समीर वानखेडेंच्या समस्यांमध्ये वाढ होताना पाहायला मिळत आहे.या प्रकरणाचा गुंता मात्र वाढतच चालला आहे .
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम