सोमेश्वर सहकारी कारखाना निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवारांना निवडून आल्याच्या शुभेच्छा निकालापूर्वीच
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक निवडीसाठी नुकतेच मतदान पार पडले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अजित पवार यांच्यासाठी सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची निवडणूक ही प्रतिष्ठेची असते. चार तालुक्यातील कार्यक्षेत्र असलेला हा कारखाना आहे. पुणे जिह्यातील इतर सर्व कारखान्यांमध्ये या कारखान्याचे क्षेत्रफळ सर्वाधिक आहे. त्यामुळे पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष या कारखान्याच्या निवडणुकीवर लागलेले असते.
चार आमदारांच्या हद्दीतील सोमेश्वर कारखान्यावर सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वर्चस्व आहे. या वर्षी सुध्दा या निवडणूकीमध्ये राष्ट्रवादीचेच पारडे जड असल्याचे पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून आपल्या उमेदवारांचे अभिनंदनाच्या पोस्ट सोशल मीडियावर चांगलेच धुमाकूळ घालत असल्याचे पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांना आपले सर्वच्या सर्व उमेदवार निवडून येणार असा विश्वास आहे.
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये भाजपचे नेते दिलीप खैरे यांनी राष्ट्रवादीच्या विरोधात पॅनेल उभा करून निवडणुकीला रंगत आणली. कारण निवडणुकीत महत्वाचा घटक असलेल्या शेतकरी कृती समितीने या निवडणुकीतून माघार घेतली. त्यामुळे भाजपा विरुद्ध राष्ट्रवादी अशी रंगत या निवडणुकीमध्ये पाहायला मिळाली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुरस्कृत सोमेश्वर विकास पॅनलच्या एका उमेदवाराची बिनविरोध निवड झाली. ‘ ‘ ब ‘ वर्गातून संग्राम सोरटे यांच्या विरोधातील अर्ज काढून घेतल्यामुळे त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पारडे जड असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे निकाल आम्हीच जिंकू असा विश्वास राष्ट्रवादीला आहे.
“घासून नाही तर ठासून येणार”, “….. तुमचे सोमेश्वर कारखान्याच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिंदन!” अशा आशयाच्या पोस्ट्स राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून टाकण्यात येत आहेत. आता मतमोजणीनंतर जनतेने कौल कोणाला दिला आहे. हे जाणून घेणं ऑस्तुक्याचे ठरणार आहे. सोमेश्वर विकास पॅनल की सोमेश्वर परिवर्तन पॅनल हे लवकरच कळेल.
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम