marathwada flood:बीड जिल्ह्याला वाऱ्यावर सोडून पालकमंत्री पुण्यात;पंकजा मुडेंचा धनंजय मुंडेंवर हल्लाबोल
पंकजा मुंडे यांच्या आरोपाला धनंजय मुंडेंनीही दिले चोख प्रत्युत्तर,मात्र आरोप-प्रत्यारोप मुळे शेतकऱ्यांना काय मिळणार
मराठवाड्यासह राज्यभर मुसळधार पाऊस कोसळल्याने शेतकरी अक्षरशः हवालदिल झाला आहे. हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून घेतल्याचे चित्र सगळीकडेच पाहायला मिळतंय
गेल्या गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या सतत मुसळधार पावसामुळे अनेकांची शेती अक्षरचा वाहून गेल्याचे देखील चित्र पाहायला मिळत आहे.
अनेकांची हातातोंडाशी आलेली उभी पिकं पावसामुळे मातीमोल झाल्याने शेतकऱ्यांचे जीवनमान विस्कळीत झाल्याचे चित्र आहे.
हे सरकार नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीबाबत सकारात्मक नसल्याचा विरोधकांकडून आरोप होताना पाहायला मिळतोय.
बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे पंकजा मुंडे यांनी जोरदार टीका केली आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री मदत करण्याऐवजी हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून पुण्याला गेले.
https://twitter.com/Pankajamunde/status/1442779889065545738?s=19
शेतकऱ्यांचे कधीही भरून न निघणारे नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांना सरसकट कोणतीही अट न घालता तातडीची मदत मिळवून देणे अपेक्षित आहे. मात्र सरकार याबाबत सकारात्मक नसल्याचे दिसत आहे.
कोणतीही आपत्ती आली तरी, प्रत्येक वेळी केंद्राकडे मदत मागायची,हे योग्य नाही. आपण या राज्याचे माय-बाप आहोत. हे कदापिही विसरुन चालणार नाही. केंद्राव्यतिरिक्त आपण महाराष्ट्राच्या जनतेला मदत करणं गरजेचं आहे असं पंकजा मुंडे म्हणाल्या.
धनंजय मुंडे यांच्यावर पंकजा मुंडे यांनी टीका केल्यानंतर धनंजय मुंडे यांनी देखील पंकजा मुंडेंवर चांगलाच पलटवार केला आहे.
जनतेला आम्ही वाऱ्यावर अजिबात सोडलेला नाही. सांगली जिल्ह्याचा खूप मोठं नुकसान झालंय. या पावसाळ्यात तब्बल अकरा वेळा ढग फुटी झाली आहे. प्रत्येक वेळी आम्ही शेतकऱ्यांच्या बांधावर होतो त्यांना द्यायचं काम करत होतो.
या परिस्थितीत बाधित शेतकरी, कष्टकरी व सामान्य नागरिकांना दिलासा व आर्थिक मदत देण्याची नितांत गरज आहे. यासाठी मुख्यमंत्री @CMOMaharashtra साहेब व उपमुख्यमंत्री @AjitPawarSpeaks दादांना पत्राद्वारे जिल्ह्याला विशेष आर्थिक पॅकेज देण्याची मागणी आज केली आहे.(1/2)#drowning_marathwada
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) September 30, 2021
खरं तर त्याच या काळामध्ये अमेरिकेत जाऊन बसल्या होत्या. जे काही शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले ते मी अजित पवार यांना सांगितले आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची देखील अपॉइंटमेंट मागितली आहे.
कोणतीही ‘अट’न घालता जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे जे काही मोठे नुकसान झाले आहे,ते भरून काढण्यासाठी सरसकट मदत करण्याची मागणी आम्ही केली आहे. असे धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांच्या आरोपाला उत्तर देताना म्हटले आहे.
एकीकडे धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले आहेत. तर दुसरीकडे दोघांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केल्याने शेतकऱ्यांना त्याचा काय फायदा होईल? असा प्रश्न नेटऱ्यांनी विचारला आहे. महाराष्ट्रातील तमाम शेतकरी हवालदिल झाला असताना देखील या लोकांना राजकारण कसं काय सुचू शकतं? असा संतप्त सवाल देखील काही नेटकऱ्यांनी विचारला आहे.
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम
Comments are closed.