Money laundering:अनिल देशमुख का झाले’गायब’?त्यांचा शोध घेण्यासाठी सीबीआयचे चौकशीचे आदेश

प्रत्येक महिन्याला मुंबईतून १०० कोटींची वसुली झाली पाहिजे,असं माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले होते. असा आरोप मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी काही महिन्यापूर्वी केल्याने राज्यात एकच खळबळ उडाली होती. (100 crore recovery accused Anil Deshmukh)

पुढे प्रचंड गदारोळ झाल्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुखांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. निपक्षपणे चौकशी व्हावी यासाठी हे प्रकरण केंद्रीय यंत्रणांच्या हातात गेले. आणि शंभर कोटींच्या वसुली आरोपामुळे अनिल देशमुख केंद्रीय यंत्रणांच्या चांगलेच रडारवर आल्याचे दिसून आले.

केंद्रीय यंत्रणेने या प्रकरणाचा तपास सुरु केल्यानंतर अनेक महत्वाचे खुलासे समोर येऊ लागले. मात्र सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे ‘अनिल देशमुख’ यांच्यावर मनी लॉड्रिंगचा गुन्हा दाखल झाल्यापासून ते एकदाही चौकशीसाठी गेले नसल्याने,अनेक शंका-कुशंका उपस्थित केल्या जात आहेत. (Anil Deshmukh has not been questioned since the money laundering case was registered)

अनिल देशमुख चौकशीसाठी का जात नाहीत? असा प्रश्न विरोधकांकडून सातत्याने उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे ‘लूक आऊट’ नोटीस काढूनही अनिल देशमुख चौकशीसाठी हजर राहीले नाहीत.

अंमलबजावणी संचालनालयाने तब्बल पाच वेळा समन्स देऊनही अनिल देशमुख चौकशीस अनुपस्थित राहिल्याने नेमक काय गोडबंगाल शिजतंय? या विषयी अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत.

 

‘मनी लॉड्रिंग’चा गुन्हा दाखल झाल्यापासून अनिल देशमुख एकदाही चौकशीसाठी गेले नाहीत. त्याच बरोबर काही महिन्यांपासून त्यांचा कोणताही ठाव-ठिकाणा लागतं नसल्याने ‘सीबीआय’ने पोलिस महासंचालक ‘संजय पांडे’ आणि राज्याचे मुख्य सचिव ‘सचिन कुंटे’ यांना या बाबत एक समन्स पाठवले असून,अनिल देशमुख हे नेमके कुठे आहेत? या संदर्भातली माहिती या दोघांना द्यावी लागणार आहे. अशी माहिती ANI या वृत्तसंस्थेने आपल्या ट्विटरवर दिली आहे. (CBI has called Maharashtra DGP and Chief Secretary for examination in connection with ongoing alleged corruption cases against former Home Minister Anil Deshmukh: Sources)

भाजपचे नेते ‘किरीट सोमय्या’ यांनी काही दिवसांपूर्वी अनिल देशमुख जर चौकशीस सामोरे जात नसतील तर,त्यांच्या संपत्तीवर ताबा मिळायला हवा. असा घणाघात केला होता.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.