राणे-पडळकर यांच्या तोंडातून बाहेर पडणारी’घाण’ही फडणवीसांच्या पोटातली; बारामतीकर

महाराष्ट्रात महा विकास आघाडीचे सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर नारायण राणे आणि गोपिचंद पडळकर वारंवार पातळी सोडून टिका करताना दिसत येत आहेत. नारायण राणे मुख्यमंत्र्यांवर तर पडळकर पवारांवर खालच्या पातळीची टीका करताना वारंवार दिसून येत असून,आता त्याचे पडसादही महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहेत.

https://m.facebook.com/story.php?story_fbid=833573694195857&id=335573796585341

विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी पडळकर यांना विधान परिषदेचे आमदार केले. तर दुसरीकडे नारायण राणे यांना राज्यसभेतून खासदारकी दिली. नुकतीच राणे यांनी केद्रात मंत्री पदाची शपथ घेतलीय. राणे यांना मिळालेली खासदारकी,मंत्रीपद हे केवळ शिवसेनेला टार्गेट करण्याकरिताच मिळाले असल्याचं अनेक राजकीय विश्लेषकांकडून यापूर्वीच सांगण्यात आलंय.

राणे यांना खासदारकी मिळाल्यापासून राणे शिवसेनेवर सतत टीका करताना दिसून येत होते. मात्र या टीकेकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सतत दुर्लक्ष केल्याचे दिसून आले. नारायण राणे मंत्री झाल्यानंतर त्यांनी जन आशीर्वाद यात्रेला सुरुवात केली. जन आशीर्वाद यात्रा दरम्यान पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी मुख्यमंत्र्यांना थेट कानशिलात हाणण्याची भाषा केली,आणि त्याचे पडसाद महाराष्ट्रभर उमटू लागले.

ठिक ठिकाणी राणे यांच्या विरोधात शिवसैनिकांकडून पोलिस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले. एवढच नाही तर महाड पोलिसांनी राणेंना अटक करत कोर्टासमोर हजर केले. राणे सध्या जामिनावर बाहेर आहेत.

राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर अनेक वेळा एकेरी भाषेचा वापर केल्याचे पाहिला मिळाले आहे. पूर परिस्थिती पाहणी दौऱ्यात त्यांनी थेट सीएम बीएम गेला उडत असंही विधान केले होते.

तर दुसरीकडे पवार आणि राष्ट्रवादीवर टिका करण्यासाठीच देवेंद्र फडणवीस यांनी पडळकर यांना विधान परिषदेचे आमदार केल्याचं बोललं गेलं. शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहे,असं विधान पडळकर यांनी केलं होत. काही दिवसांपूर्वी त्यांनी पवार हे ज्येष्ठ आहेत,श्रेष्ठ नाहीत,पवारांनी नेहमी जातीचं राजकारण केलं, अशी अनेक वादग्रस्त विधानं पडळकर यांनी केल्याची पहिला मिळाली आहेत.

‘महादेव बालगुडे’ हा बारामतीचा युवक फडणवीसांवर जोरदार टीका करताना दिसून येत आहे. फडणवीसांच्या टिकेस् संदर्भात त्याने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर केलेल्या पोस्टला हजारो लाइक्स देखील मिळत असल्याचे पाहायला मिळत आहेत.

 

देवेंद्र फडणवीस यांच्यावर टिका करताना महादेव बालगुडे म्हणतोय,CM उध्दव ठाकरे किंवा पवारसाहेबांवर वारंवार पातळी सोडून बोलणारे,तोंड जरी राणे-पडळकरांचे असले तरी, त्यातून बाहेर पडणारी ‘घाण’ही फडणवीसांच्या पोटातील आहे. वर्षा बंगल्याच्या भींतीवर लिहीलेल्या शिव्या, राणे-पडळकरांची भाषा यातून सत्ता गेल्यामुळे फडणवीसांची होणारी तडफड दिसून येते.

महादेव बालगुडे याने केलेल्या या ट्वीटला हजारो लाईक्स देखील मिळाले असून या तरुणाची सोशल मीडियावर चर्चा रंगल्याचे पाहायला मिळत आहे.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.