नातेपुते ‘उपविभाग महावितरण’चा तालिबानी कारभार!
माळशिरस प्रतिनिधी: ; मार्चमध्ये पार पडलेल्या अधिवेशन दरम्यान विधीमंडळ परिसरात शेतकऱ्यांच्या वाढीव विज बिलासंदर्भात माळशिरस तालुक्याचे आमदार,राम सातपुते सरकार विरोधात अधिक आक्रमक झाल्याचे पाहिला मिळाले होते. ‘सातपुते’यांनी विधान भवन परिसरात गळ्यामध्ये ‘मोटर स्टार्टर’ घालून ठाकरे सरकारचा निषेध केला होता.
विधानसभा सभागृहात देखील अनेकांनी वीज बिलाच्या प्रश्नावर आपले मत व्यक्त करताना संताप केला व्यक्त केला होता. मात्र सरकारने याकडे दुर्लक्ष केले. आणि सरकारने वाढत्या वीज बिलावर कोणतेही ठोस पाऊल उचलले नसल्याचं बोललं गेलं.
आता पुन्हा एकदा ‘माळशिरस’ तालुक्यातील शेतीपंपाच्या विज बिलाचा प्रश्न चर्चेत आल्याचे पाहायला मिळत आहे. माळशिरस तालुक्यातील “नातेपुते उपविभागीय महावितरण” कंपनीने कोणतीही पूर्व कल्पना’न’देता गेल्या तीन दिवसांपासून शेती पंपाची विज खंडीत केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
नातेपुते”महावितरण उपविभागाने”अचानकपणे घेतलेल्या या निर्णयामुळे शेतकरी प्रचंड संतप्त झाल्याचे दिसून येत आहे. ‘महावितरणने’ घेतलेला हा निर्णय म्हणजे त्यांचा सुरू असलेला हा मनमानी कारभार आहे. असं मत तालुक्यातील शेतकऱ्यांनी ‘महाराष्ट्र लोकशाही’शी बोलताना व्यक्त केले.
संतप्त शेतकरी पुढे म्हणाले, “महावितरण उपविभागाने” जर विज पुरवठा खंडित करण्यासंबंधी आठ दिवस अगोदर अधिकृत आदेश काढला असता तर,आम्हा शेतकऱ्यांना विज बिल भरण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला असता. आणि आमच्या पिकांचे अधिक नुकसान झाले नसते.
पावसाने पाठ फिरवल्याने शेतीसाठी पुरेसे पाणी नाही,त्यात गेल्या काही दिवसांपासून शेतमालालाचे भाव ढासळल्याने आम्ही हतबल झालो आहोत. आणि यात महावितरण उपविभागाने आणखी भर टाकली. कोणतीही पूर्व कल्पना ‘न’ देता,कोणताही अधिकृत आदेश ‘न’ काढता अचानकपणे नातेपुते उपविभागीय महावितरणने घेतलेला हा निर्णय म्हणजे अक्षरशः ‘तालीबानी’कारभार आहे. असे मत ‘शशिकांत कर्चे’ सर यांनी महाराष्ट्र लोकशाहीशी बोलताना व्यक्त केले.
शेतकऱ्यांच्या प्रश्नाविषयी नेहमी संवेदनशील असणारे,आमचे आमदार रामराऊ सातपुते या घटनेकडे जातीने लक्ष घालून विज बिल प्रश्नावर तोडगा काढून आम्हाला न्याय देतील,असंही शेवटी शेतकरी म्हणाले.
आज माळशिरस तालुका भाजपाच्या वतीने नातेपुते येथे 12 आमदारांना निलंबित करण्यात आले, त्या निषेधार्थ रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. @BJP4Maharashtra pic.twitter.com/fHqnQwvrsy
— Ram Satpute (@RamVSatpute) July 6, 2021
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत राम सातपुते माळशिरस विधानसभा मतदारसंघातून आमदार झाले. मात्र जुलैमध्ये झालेल्या दोन दिवसीय पावसाळी अधिवेशनात तालिका अध्यक्षांसोबत गैरवर्तन केल्याप्रकरणी भारतीय जनता पार्टीच्या १२ आमदारांवर एका वर्षीसाठी निलंबनाची कारवाई केली गेली. त्यात आमदार राम सातपुते यांचाही समावेश होता. सध्या ते आमदार नसले तरी लोकांच्या अडचणी सोडविण्यासाठी ते नेहमी कार्यरत असल्याचं बोललं जातं.
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम