पेट्रोल-डिझेल दराप्रमाणे तुमच्याही आयुष्याचं शतक व्हावं,पवारांकडून निर्मला सीतारामन यांना अनोख्या शुभेच्छा!
भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचा आज वाढदिवस असून निर्मला सीतारमण यांना अनेकांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र रोहित पवार यांनी दिलेल्या शुभेच्छा सर्वांचे लक्ष वेधून घेत असल्याचे पाहायला मिळत असून,त्याची चर्चा सोशल आता मीडियावर रंगू लागली आहे.
कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार सोशल मीडियावर कमालीचे अॅक्टि्व असतात. देशातल्या अनेक प्रश्नांवर ते सोशल मीडियाच्या माध्यमातून आपले परखड मत मांडताना आपण अनेक वेळा पाहिलं असेल. काही दिवसांपूर्वी रोहित पवार यांनी इंधन दरवाढी संदर्भात आपली भूमिका स्पष्ट करताना केंद्र सरकारवर टीका केली होती.
विरोधक आणि सर्वसामान्यांच्या आक्रोशाकडे केंद्र सरकार नेहमीच दुर्लक्ष करत असल्याची टीका रोहित पवारांनी काही दिवसांपूर्वी केली होती. इंधन दरवाढी संदर्भात टिका करत असताना त्यांनी ‘एसबीआय’चा या संदर्भातला एक अहवाल देखील शेअर केला होता. इंधन दरवाढीमुळे,सर्वसामान्यांनी आरोग्यावरील खर्च त्याचबरोबर खाद्यपदार्थावरील खर्च देखील कमी केले आहेत. त्यामुळे आता तरी केंद्र सरकार इंधन दरवाढीला ब्रेक लावेल. अशी अपेक्षा केंद्राकडून रोहित पवार यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून केली होती.
विरोधक व सर्वसामान्य नागरिकांच्या आक्रोशाकडं केंद्र सरकारकडून नेहमीच दुर्लक्ष होतंय. मात्र इंधन दरवाढीमुळं आरोग्यावरील अत्यावश्यक आणि दैनंदिन आवश्यक खर्चातही नागरिकांनी कपात केल्याचं #SBI चा अहवाल सांगतोय. त्यामुळं आतातरी केंद्र सरकार इंधन दरवाढीला ब्रेक लावेल, ही अपेक्षा! pic.twitter.com/cFgVbtoR9j
— Rohit Pawar (@RRPSpeaks) July 14, 2021
इंधन दरवाढीसंदर्भात विरोधकांकडून सातत्याने टीका होऊन देखील केंद्र सरकारला याचा कसलाही फरक पडला नाही. आणि म्हणून रोहित पवार यांनी देखील निर्मला सीतारामन यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना इंधन दरवाढीचा उल्लेख करत अनोख्या शुभेच्छा दिल्या आहेत.
रोहित पवार यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून निर्मला सीतारामन यांना शुभेच्छा देताना म्हटले आहे,”देशाची तिजोरी सक्षमपणे सांभाळणाऱ्या अर्थमंत्री निर्मला सितारमण जी आपल्याला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा….आपण पेट्रोल-डिझेलच्या दराप्रमाणे आयुष्याचं शतक पार करावं आणि त्यासाठी आपणास उत्तम आरोग्य लाभावं, ही प्रार्थना”
देशाची तिजोरी सक्षमपणे सांभाळणाऱ्या अर्थमंत्री @nsitharaman जी आपल्याला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आपण पेट्रोल-डिझेलच्या दराप्रमाणे आयुष्याचं शतक पार करावं आणि त्यासाठी आपणास उत्तम आरोग्य लाभावं, ही प्रार्थना! pic.twitter.com/OD0uzicic8
— Rohit Pawar (@RRPSpeaks) August 18, 2021
रोहित पवार यांनी दिलेल्या या शुभेच्छांचे सोशल मीडियावर चांगले आणि वाईट असे दोन्हीं पडसाद उमटल्याचे पाहिला मिळत आहेत.
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम
Comments are closed.