Corona Vaccine : सीरमचे पुनावाला म्हणाले, राजकारणी थापा मारत आहेत, मिक्स डोसच्याही बाबत ते म्हणाले….. (Cyrus Poonawalla)

 Corona Vaccine : ( Cyrus Poonawalla)

आमची कंपनी एका महिन्यामध्ये  दहा कोटी लसींचे उत्पादन करत आहे . जगामध्ये इतर कोणतीही लस उत्पादक कंपनी एवढ्या मोठ्या प्रमाणात लसीचं उत्पादन करू शकत नाही. त्यामुळे भारतात लस देण्याच्या आकड्याबाबत राजकारणी लोक थापा मारत आहेत अशा शब्दात त्यांनी राजकारणी लोकांचा समाचार घेतला. दोन लसींचा एकत्रित लस देण्यास   मिक्स डोस देण्यास माझा विरोध आहे, असं स्पष्ट  मत सीरमचे अध्यक्ष सायरस पुनावाला यांनी व्यक्त केले. (corona vaccine: politicians are liars, says Cyrus Poonawalla)

टिळक महाराष्ट्र विद्यापीठाकडून सायरस पुनावाला यांचा लोकमान्य टिळक पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आले. याच कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर आज ते बोलत होते. अगदी धारदार शब्दात त्यांनी राजकारणी लोकांचा समाचार घेतला.  राजकारणी लोक खोटं बोलत आहेत, ते थापा मारत  आहेत. आम्ही एका महिन्यामध्ये 10 कोटी लसींचं उत्पादन करत आहे. एका महिन्यामध्ये एवढं मोठं उत्पादन करणं ही सोपी गोष्ट नाही. जगात दूसरी कोणतीच   कंपनी दहा ते बारा कोटी लसी उत्पादित करू शकत नाही. कारण ही एवढी सोपी गोष्ट नाही . असे  पुनावला म्हणाले.

परंतु आमच्या सिरम कंपनीने हजारो कोटी रुपयांची गुंतवणूक करून हे शक्य केलं आहे. आम्ही दरवर्षी 110 किंवा 120 कोटींपर्यंत लसींच उत्पादन घेऊ शकतो.   त्या प्रमाणे तुम्हाला कॅलक्यूलेट (मोजावं) करावं लागेल. त्याचसोबत इतर लस उत्पादक कंपन्या महिन्याला एक किंवा दोन कोटी लसी देऊ शकतील. तर त्याप्रमाणे इम्यूनायझेशन वाढेल. राजकारणी लोक किती लोकांना लस  देऊ शकतात आणि किती ते किती थापा मारत आहेत  याचा विचार तुम्हीच करा असे सायरस पूनावला म्हणाले.

स्वतःच्या निष्काळीजपणामुळे लोक दगावले; आता लॉकडाऊन नको.

सध्याच्या परीस्थितीमध्ये  लॉकडाऊन करण्याची नाही .  एकदाच किड  जाईल आणि लोकांना हर्ड इम्युनिटी (Heard Immunity) मिळेल. खूप लोक दगावत असतील तर लॉकाडाऊन गरजेचं आहे. परंतु मृत्यू दर कमी असताना  50 ते 60 टक्के लोक मरण पावले ते त्यांच्या निष्काळजीपणामुळे मेले. काही लोक दवाखान्यात वेळेवर गेले नाहीत, कुणाकडे उपचार करण्यासाठी  पैसे नव्हते तर काही लोक देवाच्या भरवश्यावर घरीच राहिले. काही कम्युनिटीच्या लोकांनी तर सुरुवातीच्या काळात  उपचार करणं  देखील नाकारले आणि लसही घेणं देखील नाकारली. नंतर कोरोनाचे थैमान वाढले आणि मग त्यांनी उपचार घ्यायला सुरुवात केली.  मात्र त्यावेळी खूप उशिर झाला होता. दवाखान्यात लगेच येऊन उपचार घेतला तर मृत्यूचं प्रमाणही कमी होते.

आम्हाला  लोकांच्या दु:खातून पैसा कमवायचा नाही. राज्यातील व देशातील कोरोनाने होणारे मृत्युंच प्रमाण कमी झाले तरी मला फरक पडणार नाही. आम्हाला लोकाच्या दुःखाचा पैसा मिळवायचा नाही.  एकत्रित पणे लस देण्यास मिक्स डोसला माझा विरोध आहे. कारण दोन्ही लसी एकत्रित घेतल्याने चुकीचा परिणाम झाला तर समोरची लस म्हणेल सिरमची लस योग्य नाही. सिरमच्या लसिमुळे प्रॉब्लेम निर्माण झाला.

बाहेरील काही देशांत शाळा महाविद्यालये सुरू करत आहेत. त्यामुळे काही परिणाम होत आहेत हे आपल्या सर्वांसमोर आहेत त्यामुळे थोडे दिवस शाळा बंद राहिल्या आणि विद्यार्थ्यांनी घरी बसून अभ्यास केला तरी काही बिघडणार नाही. विद्यार्थी घरी सुद्धा अभ्यास करू शकतात. मी स्वतः कधी कॉलेजमध्ये जात नव्हतो. पवार साहेबांना विचारा मी नेहमी त्यांना कॅन्टीन मध्येच सापडायचो. तरीदेखील मी सिरम इन्स्टिट्यूट उभारली. (corona vaccine: politicians are liars, says Cyrus Poonawalla)

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.