Maharashtra HSC Result 2021 Date: बारावीचा निकाल दुपारी 4 वाजता जाहीर होणार; निकाल कसा पहायचा?

  1. Maharashtra HSC Result 2021 Date: इयत्ता १० वीचा निकाल जाहीर झाल्यापासून   महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीच्या निकालाचीही देखील विद्यार्थी प्रतीक्षा करत होते. Maharashtra HSC Result 2021 चा  निकाल  मंगळवार दिनांक 3 ऑगस्ट रोजी दुपारी 4 वाजता जाहीर होणार आहे. HSC कडून विद्यार्थ्यांचे परीक्षा क्रमांक जाहीर करण्यात आले आहेत.  या संकेस्थळावर http://mh-hsc.ac.in जाऊन परीक्षा क्रमांक प्राप्त करू शकतात. (Maharashtra HSC Result 2021 Maharashtra msbshse declare today at 4 pm class 12th result on 3rd August check at hscresult.11theadmission.org.in and msbshse.co.in hscresult.mkcl.org)

  कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे या वर्षी  दहावी, अकरावी व बारावीच्या परीक्षा घेणे शक्य झाले नाही. यावर बरेच वाद प्रतिवाद झाले.  त्यामुळे  अंतर्गत गुणमापन पध्दतीनुसार यावर्षी विद्यार्थ्यांना मार्कस देण्यात आले आहेत. प्रॅक्टिकल, तोंडी परीक्षा, याद्वारे मार्कस देण्यात आले आहेत.  परंतु एक महत्वाची बाब म्हणजे बारावी परीक्षेला बाहेरून बसलेले विद्यार्थी व पुन्हा परीक्षा देणारे विद्यार्थी यांच्यासाठी एक वेगळी नियमावली शिक्षण विभाग लवकरच जाहीर करेल.

2021 या वर्षासाठी नोंदणी केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे सर्व विषयांचे  गुण खालील वेबसाइटवरून  प्राप्त करता येतील व सदर माहितीची प्रत (प्रिंट ) घेता येईल.

खालील संकेस्थळावर जाऊन तुम्ही तुमच्या निकाल पाहू शकता.

1. https://hscresult.11thadmission.org.in

2. https://msbshse.co.in

3. hscresult.mkcl.org

4. mahresult.nic.in.

एचएससी बोर्डाचा १२ वीचा  निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी वर दिलेल्या वेबसाईट पैकी कोणतीही एक  वेबसाईट तुमच्या ब्राउझर वर सर्च करा. त्यामध्ये तुम्हाला HSC BOARD RESULT नावाचा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करून तुम्हाला त्या ठिकाणी तुमचा परीक्षा क्रमांक किंवा बैठक क्रमांक त्या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर तुम्हाला तुमच्या आईच्या नावाचे पहिले ३ अक्षरे टाकायची आहेत. समजा जर तुमच्या आईचे नाव SANGEETA असे आहे. तर त्या ठिकाणी तुम्ही SAN असे टाईप करा.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.