.. म्हणून चार दिवस गाव अंधारात! ‘पिंपरी’गावातला अजब प्रकार वाचा सविस्तर

माळशिरस; काही दिवसांपूर्वी पिंपरी गावातील ‘राणबादेव’वस्ती परिसरात विजेचा पोल पडल्याने ‘राणबादेव’वस्तीवरील लोकांना तब्बल ‘दहा दिवस’ अंधारात राहवं लागलं होतं.
आता पुन्हा एकदा या वस्तीवरील लोकांचा विज पुरवठा खंडित झाला असून,गेले चार दिवस ‘राणबादेव’वस्ती अंधारात असल्याचं सांगण्यात येतंय.

विजेचं हे संकट पुन्हा एकदा या वस्तीवर ओढवलं आहे, हे जरी खरं असलं तरी,गेले चार दिवस विज पुरवठा खंडित झाल्याचे जर तुम्ही कारण जाणून घेतले,तर तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.

त्याचे झाले असे,मेन लाईन तारेपासून डीपीमध्ये येणारी अवघी तीन फूट विद्युत केबल जळाली. आणि राणबादेववस्तीचा विद्युत पुरवठा खंडित झाला. अवघ्या तीन फूट जळालेल्या केबलमुळे नागरिकांना तब्बल चार दिवस अंधारात राहावं लागल्याचा अजब प्रकार समोर आला आहे. अद्याप देखील विद्युत पुरवठा सुरळीत होऊ शकला नसल्याने,नागरिक संताप व्यक्त करत आहेत.

किरकोळ कारणामुळे,गेले चार दिवस वीज पुरवठा खंडित झाल्याने,आम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे नागरिकांनी यावेळी सांगितले. वापरासाठी लागणाऱ्या पाण्याची,जनावरास लागणाऱ्या पाण्यासाठी,आम्हाला मोठी कसरत करावी लागत असल्याचं त्यांनी सांगितलं.

वीज पुरवठा खंडित झाल्याने गेल्या चार दिवसांपासून मोबाईल फोन देखील बंद पडले आहेत. रोज फोनवर बोलणाऱ्या नातेवाईकांशी आणि परगावी असणाऱ्या घरातील मंडळींशी चार दिवसांपासून बोलणं होऊ शकलं नाही. कोरोणाच्या परिस्थितीमुळे कुठे मोबाईल चार्ज करण्यासाठी देखील जाता येत नाही. चार दिवसांपासून बोलणं झालं नसल्याने परगावी असणाऱ्या आमच्या नातेवाईकांना आमच्यावर काहीतरी मोठं संकट आलं की काय? असं वाटत असेल,या विचाराने आम्ही खूप चिंतेत असल्याचं सांगताना नागरिक हतबल झाल्याचे पाहायला मिळाले.

ग्रामपंचायत,प्रशासन यांच्या बेजबाबदार कामगिरीपुढे आता आम्ही गुढघे टेकले असल्याचे सांगत,स्थानिकांनी आपला संताप महाराष्ट्र लोकशाहीशी बोलताना व्यक्त केला.

‘तीन फूट’केबल बसवून,वीज पुरवठा सुरळीत करण्याकरिता, प्रशासन,आणि एम एस सी बीला आणखी किती दिवस लागणार? हे पाहणं आता औत्सुक्याचे ठरणार आहे.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.