Satara Ambeghar Landslide : चिमुकल्याला कडेवर घेऊन चितेवर ठेवलं, एकाच चितेवर कुटुंबातील 6 जणांना अग्नी

 

सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील आंबेघर गावातील कोळेकर कुटुंबावर निसर्गाने खूप मोठे संकट आणले आणि अक्षरशः अख्खंच्या अख्ख कुटुंब नष्ट झाले. दरड कोसळल्यामुळे आंबेघर येथे साधारण 14 ते 16 लोक ढिगाऱ्याखाली गाढले गेले होते. या ढिगाऱ्यातून 9 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे. मृत झालेल्यांमध्ये कोळेकर कुटुंबातील 6 जणांचा समावेश होता

एकाच कुटुंबातील 6 जणांवर आज एकाच चितेवर अंत्यसंस्कार करण्यात आले.  मृतदेह बाहेर  काढल्यानंतर जागेवरच शवविच्छेदन (Postmortem) करण्यात आलं. मृतांमध्ये एका चिमुकल्याचा देखील मृतदेह होता. त्याला पाहून उपस्थित नागरिकांचे अंतकरण दाटून आले. (Satara Ambeghar Landslide Funeral for 6 family members of Kolekar family at Ambeghar in Satara District)

पाटण तालुक्यातील आंबेघर हा एक पाडा आहे. या गावामध्ये एकूण 8 घरं होती.8 पैकी 4 घरांवरती दरड कोसळली व या घरातील सुमारे 14 ते 16 लोक ढिगाऱ्याखाली दबले गेले. दुर्घटनेला कितीतरी तास उलटले तरीदेखील त्या ठिकाणी मदत आणि बचावकार्य सुरु झालं नाही. आसपासच्या गावातील नागरिक त्या ठिकाणी गेले व बचावकार्य सुरु केलं.

या घटनेमध्ये तीन भाऊ आणि त्यांचं कुटुंब ढिगाऱ्याखाली दबल गेलं. उत्तम कोळेकर आणि त्यांच्या तीन भावंडांची घरे या ढिगाऱ्याखाली दबली गेली. यामध्ये तीन भाऊ, त्यांच्या पत्नी आणि त्यांचे पाहुणे असा समावेश आहे. विशेष बाब म्हणजे एवढा वेळ होऊन देखील त्या ठिकाणी प्रशासन पोहोचले नव्हते. परंतु नागरिकांनी बचाव कार्याला सुरुवात केली होती.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.