पहिली ते बारावीपर्यंतच्या अभ्यासक्रमात 25 टक्के कपात

राज्यातील सध्या कोरो-नाची परिस्थिती पाहता आणि ऑनलाईन सुरु असणारं शिक्षण लक्षात घेत राज्य शिक्षण मंडळानकडून यावर्षी अभ्यासक्रमामध्ये कपात करण्यात आली आहे. इयत्ता पहिली ते 12 वी साठीचा अभ्यासक्रम कमी करण्यात येत असल्याचे  शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

कोरो-ना महामारीची सुरूवात झाल्यापासून राज्यामध्ये अनेक ठीकणी ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. गेल्यावर्षीदेखील को-रोना महामारीमुळेच अभ्यासक्रमात 25 टक्के कपात करण्यात आली होती. देशासह महाराष्ट्रातील कोरोनाची परिस्थिती अद्याप सुधारलेली नाही. राज्यात अनेक ठिकाणी लॉकडाऊन आणि विविध निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

अशा परिस्थितीमध्ये शाळांनीदेखील विद्यार्थांचं ऑनलाईन शिक्षण सुरु केलं आहे. परंतु ऑनलाईन शिक्षणाला देखील काही मर्यादा आहेत. बऱ्याच ठिकाणी तांत्रिक अडचणी निर्माण होत असतात.   गेल्या वर्षीप्रमाणे या वर्षी  शालेय अभ्यासक्रमात 25 टक्के कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्यातील विद्यार्थ्यांचे हित व काही बाबी लक्षात घेऊन व शिक्षक व पालक संघटनेने केलेल्या मागणीचा विचार करून यावर्षीच्या शैक्षणिक वर्षात राज्य शिक्षण विभागाने 25% अभ्यासक्रम कमी करून विद्यार्थ्यांना व पालकांना  फार मोठा दिलासा दिला आहे.

‘सर्व संबंधित घटकांशी विचारविनिमय केल्यानंतर आणि कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर आरोग्य सुरक्षेच्या दृष्टिकोनातून गतवर्षीप्रमाणे या वर्षीदेखील शैक्षणिक वर्ष 2021-22 साठी  पहिली ते 12 वी पर्यंतचा 25% पाठ्यक्रम कमी करण्याचा निर्णय शिक्षण विभागाकडून घेण्यात आला आहे,’ अशी माहिती राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विटरद्वारे दिली आहे.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.