धक्कादायक : चक्का हुंड्यात मागितले लॅब्रॉडॉर कुत्रे, कासव; भावी नवरदेवावर गुन्हा दाखल

पूर्वीपासून लग्न म्हटलं की हुंडा आलाच. ही परंपरा कुठेतरी काही मंडळी मोडीत काढत निघाली असली तरी काही मंडळी अजूनच आपल्या मागण्या वाढवत असल्याच्या बातम्या आपल्या देखील कानावर येत असतील.  लग्न झाल्यानंतर विवाहितेचा छळ, जिवंत जाळणे, आत्महत्येस प्रवृत्त करणे अशा घटना घडत असतात. आपण अशी एक घटना पाहणार आहोत ह्यामुळे तुम्ही देखील हैराण व्हाल.

साखरपुडा करत असताना  हुंडा म्हणून सव्वादोन लाख रुपये देण्याची तयारी झाली. साखरपुडा देखील पार पडला. मात्र अचानक भावी नवरदेवाच्या परिवारातील काही सदस्यांकडून अजबच मागणी वधुपक्षासमोर ठेवण्यात आली. मुलीला नोकरी करण्यासाठी दहा लाख रुपये द्यावे. दहा लाखांसोबत २१ नखी कासव सोबतच लॅब्रॉडार जातीचा कुत्रा व अन्य  वस्तूंची मागणी ठेवली गेली. ही मागणी  पूर्ण न केल्यामुळे लग्न देखील मोडले.

या अजबच प्रकरणी वधुपक्षाने थेट पोलिस ठाणे गाठले.  हुड्यांच्या दहा लाखांसह अजब मागणी ठेवणाऱ्या भावी नवरदेव व  त्याच्या कुटुंबातील अन्य सदस्यांच्या विरोधात उस्मानपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  1. वीटभट्टी व्यावसायिक असणाऱ्या अनिल मगनराव सदाशिवे  यांनी दिलेल्या  तक्रारीनुसार, सदाशिवे परिवारातील मुलीला नाशिक येथील चराटे कुटुंबाने पसती दाखवली. लग्न जमवत असताना वाधुपक्षाकडून  हुंडा म्हणून  सव्वादोन लाख रुपये तसेच सोन्याची अंगठी देण्याचे ठरले. सदाशिवे यांनी साखरपुडा करताना ही मागणी पूर्णदेखील केली. साखरपुड्यापूर्वी  वर पक्षाकडील काही सदस्यांनी आणखी मागण्या सदाशिवे यांच्यासमोर ठेवल्या.  जिवंत कासव, तसेच लब्रॉडॉर कुत्रा, मूर्ती आणि समईसारख्या वस्तूंची मागणी करण्यात आली. वधू पक्षाकडून दिलेल्या  तक्रारीवरून साखरपुडा करण्यापूर्वी नाशिक येथील रवींद्र चराटे व अन्य चार ते पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.