धक्कादायक: कोकणामध्ये मोठी दुर्घटना, दरड कोसळल्यामुळे ३० घरे ढिगाऱ्याखाली; ७० जण अडकल्याची भीती

एकीकडे   मुसळधार पावसाने बऱ्याच ठिकाणी हाहाकार मजवलेला असताना  रायगड जिल्ह्यामध्ये  हृदय हेलावून टाकणारी दुर्घटना घडली आहे. रायगड मधील महाड तालुक्यात दरड कोसळली असल्याची घटना घडली  असून सुमारे  ३० घरे या  ढिगाऱ्याखाली आली आहेत. या  ढिगाऱ्याखाली एकूण ७० जण अडकली असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

महाड तालुक्यातील बिरवाडी या गावातील सुमारे  ३० घरे ढिगाऱ्याखाली आल्याची प्राथमिक माहिती महाराष्ट्र लोकशाहीला मिळाली  आहे. या परिसरातील बरेच  लोक बेपत्ता झाल्याची शंका असून पोलिस यंत्रणा व महसूल प्रशासन घटनास्थळी दाखल झालं आहे.

कोकणातील विविध भागामध्ये पावसाचां  धुमाकूळ सुरू असल्याने अनेक दुर्घटना घडत आहेत. अनेक ठिकाणचे  पूलदेखील कोसळले आहेत, तर काही ठिकाणी पुराच्या पाण्यामध्ये लोक वाहून गेल्याच्या घटना देखील घडत आहेत.   त्यातच आता महाडमध्ये तब्बल ३० घरे ढिगाऱ्याखाली अडकली गेल्याने मोठी  खळबळ उडाली आहे.

महाडमधील दरड कोसळली असल्याची माहिती मिळताच  प्रशासनाकडून तत्काळ मदतकार्यासाठी हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र पुराच्या पाण्यामुळे घटनास्थळी मदत पोहोचवण्यासाठी अडचण व विलंब होण्याची भीती वर्तवण्यात येत आहे

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.