मनसेचा अदानी समूहाला इशारा, आम्हाला झिंगाट दाखवावा लागेल

नुकताच गौतम अदाणी यांच्या अदाणी समूहाने मुंबई विभागाचा कारभार समूहाच्या ताब्यात घेतला आहे.
यशस्वीपणे पूर्णदेखील करू. या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल असे अदाणी यांनी आपल्या ट्विट मध्ये नमूद केले आहे.

सोबतच अदाणी समूहाकडे नवी मुंबई विमानतळाच्या उभारणीचे काम देखील हस्तांतरित करण्यात आले आहे. अदानी एअरपोर्ट होल्डींग ही कंपनी देशातील सर्वात मोठी विमानतळाचे व्यवस्थापन पाहणारी कंपनी ठरली आहे. देशातील चार विमानतळाबचा कारभार अदानी समूहाकडे सोपवण्यात आला आहे

लखनऊ, मंगळूरू, आणि अहमदाबाद विमानतळाचा कारभार अदानी एअरपोर्ट होल्डिंग या कंपनीकडे आहे. त्यांमध्ये आता मुंबई विमानतळाची भर यामध्ये पडली आहे. सोबतच काही विमानतळे लवकरच या कंपनीकडे सोपवण्यात येणार आहेत.

मनसे पक्षाचे नेते, माजी आमदार नितीन सरदेसाई यांनी ट्विट केले आहे. त्यामध्ये ते म्हणतात, “फक्त व्यवस्थापन अदानी समूहाकडे गेले आहे
आम्हाला डीवचण्यासाठी ‘गरबा’ कराल तर आम्हालाही आमचा ‘झिंगाट’ दाखवावा लागेल.

पुढील 50 वर्ष अदानी समूह या विमानतळाची जबाबदारी अदानी ग्रुपकडे असणार आहे. विमानतळाचा विकास, प्रशासकीय कामकाज, देखरेख ठेवण्यासाठी हा करार करण्यात आलेला आहे, विमानतळ मुंबईमध्येच आहे.

 

 

 

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.