अरुण गवळी (डॅडी) जेलमध्ये घेतोय शिक्षण

अंडरवर्ल्ड जगताचा डॉन अरुण गवळी त्याला  डॅडी या नावाने सर्वत्र ओळखले जाते.  अरुण_गवळीला  शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसांदेकर यांच्या ह_त्याप्रकरणामध्ये जन्मठेपेची  शिक्षा झाली आहे. सध्या  तो सध्या नागपूर मध्यवर्ती कारागृहामध्ये बंदिस्त  आहे.  नागपूर येथील कारागृहामधून अरुण गवळी बाबत एक अधिकृत माहिती  मिळाली आहे.

अरुण गवळीने उंडरवर्ल्ड मध्ये आपली दह-शत निर्माण केली होती. दगडीचाळ मध्ये राहणारा गवळी हिंदू_डॉन म्हणून देखील सर्वत्र ओळखला जातो. त्याचा स्वतःचा एक पक्षदेखील आहे. गवळी  आमदार म्हणून निवडून देखील आला आहे.

अरुण_गवळी  चक्क कारागृहामध्ये  शिक्षण घेत असल्याचे  वृत्त समोर आले आहे.  गवळी हा सध्या नागपूर कारागृहामध्ये  अभ्यास करत  आहे. अरुण गवळीने   पदवी मिळवण्यासाठी इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठामध्ये बीएच्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला होता. बीए  (BA) मध्ये तो आपलीं पदवी पूर्ण करत आहे. त्या अंतर्गत त्याने ने ‘द स्टडी ऑफ सोसायटी सोसायटी इन इंडिया फाउंडेशन कोर्स इन हुम्यानिटी अँड सोशल सायन्स या  विषयांची निवड केली आहे.

सध्या अरुण-गवळी हा बीएच्या अंतिम वर्षामध्ये शिकत  आहे. बीए परीक्षेमध्ये अरुण गवळीने पाच पैकी तीन विषयांमध्ये चांगले  गुण देखील मिळवले आहेत.. या मुक्त विद्यापीठामध्ये प्रवेश घेण्याआधी  अभ्यासक्रमाविषयी आणि परीक्षेच्या प्रक्रियेविषयी चौकशीसुद्धा केली होती. त्यानंतर  गवळीने बीएचे विषय निवडल्याचं विभागीय संचालक डॉ पी शिवस्वरूप यांनी नमूद केले.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.