महाराष्ट्रामध्ये क-रोना मृत्यूंची आकडेवारी खरंच लपवली जात आहे का?

गेल्या काही दिवसांपासून विरोधकांकडून राज्य सरकारवर क-रोनाची आकडेवारी लपवली जात आहे अशी टीका वारंवार करण्यात  येत आहे.   विधानसभा विरोधी पक्षनेते   देवेंद्र फडणवीस यांनी देखील राज्य सरकार  मृतांची आकडेवारी लपवत आहे  असा आरोप केला होता. याच पार्श्वभूमीवर  राज्याच्या आरोग्य विभागाकडून  या आरोपांवर स्पष्टीकरण देण्यात आले  आहे. “को-रोनाची रुग्णसंख्या,  को-रोनामुक्त   रुग्ण, को-रोनाग्रस्त मृत्यू यांच्या माहितीची व्याप्ती ही फार  प्रचंड  आहे. याबाबत महाराष्ट्राची साथरोग सर्वेक्षण यंत्रणा अगदी  पारदर्शकपणे काम करत आहे.

यामध्ये  कोणतीही आकडेवारी लपवली जात नाही नाही. महाराष्ट्राचे  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील याअगोदर अतिशय पारदर्शकपणे कोरोना रुग्णसंख्येची माहिती जाहीर  करण्याबाबत सूचना दिल्या  आहेत. तांत्रिक अडचणींमुळे काही वेळा माहिती जाहीर होण्यास  विलंब होतो. माहिती अद्ययावत करण्यासाठी जिल्हा आणि महानगरपालिका  यांच्याकडे  नियमित पाठपुरावा केला जात आहे”, असं स्पष्टीकरण राज्याच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आलं आहे. यासाठी  रोजची रुग्णांची आकडेवारी कशी तयार केली जाते, याची प्रक्रिया राज्याच्या आरोग्य मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आली आहे.

अशी होते  रुग्णसंख्या  मृत्यूंची नोंद.
केंद्र सरकार कोविड रिपोर्टिंग करण्यासाठी दोन पोर्टलचा वापर करत आहे. १)  बाधित रुग्णांसाठी आयसीएमआरचे सीव्ही अॅनालिटिक्स पोर्टल वापरले जात आहे आणि कोविन १९ पोर्टल मृतांच्या आकडेवारीसाठी वापरले जात आहे. याचबरोबर प्रयोगशाळांकडून माहिती मिळवण्यासाठी आरटीपीसीआर ॲप आणि रुग्णालयांकडून फॅसिलिटी ॲपचा वापर करण्यात येत आहे.

प्रत्येक प्रयोगशाळा आपण केलेल्या नमुना तपासणीची व्यक्तीनिहाय माहिती आरटीपीसीआर ॲपद्वारे आयसीएमआरच्या सी.व्ही. अॅनालिटिक्स पोर्टलवर भरत असते.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.