‘विरार’घटनेत 13जणांचा होरपळून झालेला मृत्यू ही ‘नॅशनल न्यूज’ नाही; राजेश टोपे

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून,मृत्यूचे प्रमाण देखील अधिक असल्यामुळे अनेक स्तरातून चिंता व्यक्त केली जातेय. व्हेंटिलेटर,ऑक्‍सिजन, रेमडेसिविरची मोठ्या प्रमाणात मागणी असून देखील पुरेसा पुरवठा होत नसल्याने,रुग्णांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. एवढे कमी की काय म्हणून, नुकतेच नाशिकमध्ये एका रुग्णालयात ऑक्सीजनचा पाइप फुटून गॅस गळतीत तब्बल 24 रुग्णांना आपला प्राण गमवावा लागला. ही बातमी ताजी असतानाच आज ‘विरारमध्ये’ कोवीड सेंटरला लागलेल्या आगीत 13 जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची दुःखद घटना घडली आहे.

राज्यात कोरोनाचं संकट दिवसेंदिवस वाढत असून, कोरोना रुग्णांच्या अडचणी काही कमी होताना दिसत नाहीत. रुग्णांना व्हेंटिलेटर बेड्स मिळत नाहीत. ऑक्‍सिजनची कमतरता भासत आहे. अशा अनेक संकटाला सामोरे जात असतानाच गेल्या दोन दिवसात दोन भयानक घटना घडल्याने,सर्व स्तरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

आज विरारच्या विजय वल्लभ रुग्णालयात कोवीड सेंटरच्या ‘एसीचा’ स्फोट झाल्याने लागलेल्या आगीत तेरा जणांचा होरपळून जागीच मृत्यू झाला. यामध्ये काही रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याचं सांगण्यात आलंय. या दुर्दैवी घटनेविषयी अनेकांनी हळहळ व्यक्त केली असून,मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी,मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाख तर, जखमींना एक लाखाची मदत करण्याचं जाहीर केलं आहे.

 

देशाचे गृहमंत्री अमित शहांनी देखील ट्विट करून या घटनेविषयी दुःख व्यक्त केले आहे. त्याचबरोबर पंतप्रधानांनी ही घटना दुर्दैवी असल्याचे म्हणत, मृतांच्या नातेवाईकांना दोन लाखांची तर जखमींना 50 हजारांची मदत जाहीर केली आहे.

 

राज्यातल्या बिजेपीच्या नेत्यांनी देखील ही घटना अतिशय दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे. त्याचबरोबर त्यांनी राज्य सरकारच्या ढिसाळ कारभाराविषयी देखील प्रश्न उपस्थित केले आहेत.

 

 

राज्याचे आरोग्य मंत्री ‘राजेश टोपे’ यांनी माध्यमांशी बोलताना विरारमध्ये घडलेली ही घटना, ‘राष्ट्रीय बातमी’ नसल्याचं अजब वक्तव्य केलं. राजेश टोपे यांनी केलेल्या या असंवेदनशील वक्तव्याचा ‘विरोधकांनी’ चांगलाच समाचार घेतल्याचे दिसून आले.

 

राजेश टोपे यांनी विरार घटनेविषयी केलेल्या असंवेदनशील वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना भाजपा नेत्या चित्रा वाघ म्हणाल्या,राज्यात ‘निष्पाप’ लोक होरपळून मरताहेत, एकापाठोपाोठ एक अग्नीकांड सुरू आहे,माणसं हवालदिल झालीत,त्यांना आधाराची गरज आहे. मात्र आरोग्यमंत्री ही घटना”नॅशनल न्यूज”नाही म्हणत पिडीतांच्या जखमेवर मीठ चोळायचं काम करत आहेत. किती असंवेदनशीलता..?
मायबाप सरकारची ही प्रतिक्रिया अतिशय दुर्दैवी आहे.

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेता ‘प्रवीण दरेकर’ यांनी देखील राज्य सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. प्रवीण दरेकर यांनी या घटनेविषयी बोलताना चुका आम्ही ‌समजू शकतो,मात्र हा व्यवस्थेतील निव्वळ निष्काळजीपणा आहे. महाराष्ट्रातील रुग्णालय आग प्रतिबंधक सुरक्षा व्यवस्था रामभरोसे आहे. भंडारा,भांडुप नागपूर,आणि आता विरार रुग्णालयांना आगी लागल्या. कोरोनापेक्षा सरकारच्या मुर्दाडपणामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागत असल्याचा, घणाघात प्रविण दरेकर यांनी महा विकास आघाडी सरकारवर केला आहे.

 

 

 

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.