ब्रेकिंग न्यूज! पूजा चव्हाण प्रकरणी संजय राठोड यांनी राजीनामा का दिला?

पूजा चव्हाण प्रकरणामुळे  गेले अनेक दिवस अडचणीत  सापडलेले वनमंत्री संजय राठोड यांनी अखेर राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्र्यांच्या  शासकीय निवासस्थानी पत्नीसह  वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीमध्ये राठोड यांनी राजीनामा दिला. मुख्यमंत्र्यांनी राठोड यांचा राजीनामा स्वीकारलेला नाही. विधिमंडळाचे अधिवेशन तोंडावर असतानाच भाजपाने संजय राठोड  यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करत अधिवेशनात कामकाज चालू न देण्याचा इशारा दिला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीदेखील राठोड यांना दोन दिवसांपूर्वीच निर्णय घेण्याचे आदेश दिले होते.

बीड जिल्ह्यातील युवती पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्या प्रकरणामध्ये नाव समोर आल्यानंतर वनमंत्री संजय राठोड अडचणीत आले होते. पूजा चव्हाणचे संजय राठोड  सोबतचे फोटो आणि या प्रकरणाशी संबंधित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर भाजपाकडून  संजय राठोड यांच्यावर रोज आरोप करण्यात येत होते. त्यावेळी राठोड यांनी पोहरादेवी येथे  माध्यमांशी बोलत असताना चौकशीतून सगळं समोर येईल. आपली बदनामी केली जात असल्याचाही आरोपही राठोड यांनी केला होता. मात्र, अर्थसंकल्पीय अधिवेशन तोंडावर असताना भाजपा नेत्यांनी राठोडांचा राजीनामा घेऊ कारवाई करण्याची मागणी केली होती. नाहीतर अधिवेशन होऊ देणार नाही असा इशारा दिला होता.

जर सरकारने राठोडांवर कारवाई केली नाही, तर अधिवेशनाचे कामकाज चालू देणार नाही, असा इशारा भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला होता. रोज वेगवेगळे पूजा चव्हाण व राठोड यांचे फोटो समोर येत असल्यामुळे  सरकारवर दबाव वाढला होता. त्यानंतर आज (२८ फेब्रुवारी) संजय राठोड यांनी आपल्या पत्नीसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. दुपारी अडीच वाजताच्या सुमारास संजय राठोड हे पत्नी व मेहुणे सचिन नाईक यांच्यासह वर्षा बंगल्यावर गेले होते.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.