मांडवी नेत्र रुग्णालयातच होणार,नेत्र रुग्णांचे ऑपरेशन;विपीन इटनकर

*मांडवी प्रतिनिधी-इंद्रपाल कांबळे,*

किंनवट तालुक्यातील मांडवी गावामध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियानातर्फे बळीराम पाटील ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय दंत व आयुष्यमान आरोग्य शिबिराचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या हस्ते आज संपन्न झाले.

सर्व सोयीनुसार आता नेत्र रुग्णांचे अॉपरेशन मांडवीच्या नेत्र रुग्णालयातच होणार असून यासंदर्भात उपस्थित नेत्र सर्जनशी चर्चा करून यासाठी सर्व आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. असं आश्‍वासन जिल्हाधिकारी यांनी या कार्यक्रमात बोलत असताना दिले.

किनवटचे आमदार भीमराव केराम यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला. आमदार भीमराव केराम या कार्यक्रमात बोलताना म्हणाले,आरोग्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी साहेब विशेष लक्ष देतील. किनवट व माहूर ही बहुतांशी भाग हा आदिवासी जमात आहे. त्यामुळे आदिवासी भागात रोग निदान शिबीर घेऊन आरोग्याची जनजागृती करण्यात जिल्हाधिकारी महत्त्वाची भूमिका बजावतील. उपस्थित डॉक्टरांचा स्थानिकांना अधिक फायदा होईल. अशा अनेक महत्त्वाचा मुद्दांवर आमदार बोलले.

आमदार भिमराव केराम यांच्याबरोबर, या कार्यक्रमाला नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी वीपीन इटकर,जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.निळकंठ भोशीकर,तहसीलदार उत्तम कागणे,गट विकास अधिकारी शुभास धवणे,जिल्हा परिषद सदस्य मधुकर राठोड,डॉ.मोहिनी पाटील, त्याचबरोबर मांडवी गावचे सरपंच हिराबाई अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.

तत्पूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी या दवाखान्याची पाहणी केली. जिल्हाधिकारी या कार्यक्रमात कार्यक्रमात बोलताना म्हणाले, मागील वर्षी कोरोना संसर्गजन्य रोगाचा प्रसार होऊ नये म्हणून, आरोग्य विभागाने जे काम केले, ते अतिशय प्रशंसनीय होते. अजूनही कोरोणा आजार गेला नाही,त्यासाठी मास्क वापरणे, सतत हात धुणे,आणि गर्दी टाळणे हे त्रिसूत्री वापरून आपण जीवन सुरक्षित ठेवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणे गरजेचे आहे.

डॉ.संजय मुरमुरे यांनी या कार्यक्रमाचे आभार मानले. त्याचबरोबर या कार्यक्रमात परिसरातील अनेक गरजू रुग्ण मोठ्या प्रमाणात आले होते. आरोग्य विभागाकडून वेगवेगळे स्टॉल देखील लावण्यात आले होते.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.