रक्तदान करा व मिळावा एक किलो चिकन; शिवसेनेचा उपक्रम
कारोना काळामध्ये सर्वत्र रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे राजकीय नेते मंडळींकडून मोठ्या प्रमाणावर रक्तदान शिबिरांचे आयोजित करण्यात येत असून निरनिराळ्या भेटवस्तू देऊन नागरिकांना रक्तदानासाठी प्रोत्साहन देण्याचे प्रयत्न नेते मंडळींनी चालविले आहेत. तर प्रभादेवी या ठिकाणी रक्तदान करणाऱ्या मांसाहारीं लोकांना कोंबडीचे एक किलो मांस, तर शाकाहारी लोकांना पनीर देण्यात येणार आहे. प्रभादेवीत सध्या कोंबडीचे मांस आणि पनीरची जोरदार चर्चा सुरू आहे.
राजकीय नेतेमंडळी सहित सामाजिक संघटना देखील करोनाच्या काळात रक्तदान शिबिरांचे आयोजन करत आहे. मात्र कोरोना संसर्गामुळे लोक रक्तदान करण्यास तयार होत नसल्याचे चित्र दिसत आहे. तसेच रक्तदानापूर्वी कोरोना चाचणी करण्यात येत असून त्यात बाधा झाल्याचे निष्पन्न झाल्यास विलगीकरणात जावे लागेल अशी भीती देखील नागरिकांच्या मनात घर करुन बसली आहे. त्यामुळे ऐनवेळी रक्तदान करण्यास तयार असणारी मंडळी सध्या रक्तदान शिबिरांकडे पाठ फिरवताना दिसत आहेत.
रक्तदान शिबिरांचे आयोजन करणाऱ्या मंडळींनी देखील लोकांच्या मनातील भीती ओळखूली व रक्तदान करणाऱ्यासाठी भेटवस्तू देण्याचे आमीष दाखविण्यास सुरुवात केली आहे. भेटवस्तूच्या माध्यमातून रक्तदाते मिळतील असे आयोजकांना वाटत आहे.अशीच एक भन्नाट कल्पना शिवसेनेचे नगरसेवक समाधान सरवणकर यांनी माहीम – वरळी विधानसभा क्षेत्रात १३ डिसेंबर रोजी महा रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. हे रक्तदान शिबीर न्यू प्रभादेवी रोडवरील राजाभाऊ साळवी मैदाना या ठिकाणी पार पडणार आहे.
या रक्तदान शिबिरास मोठ्या संख्येने नागरिकांनी रक्तदान करावे या उद्देशाने मांसाहारी रक्तदात्याला कोंबडीचे एक किलो चिकन व शाकाहारी रक्तदात्याला पनीर देण्यात येणार असल्याचे फलक प्रभादेवी परिसरात लावले आले आहेत. या शिबिरात रक्तदान करण्यासाठी नागरिकांना प्रभादेवी येथील शिवसेना शाखा क्रमांक १९४ मध्ये ११ डिसेंबरपूर्वी आपली नाव नोंदणी करावी लागणार आहे. या रक्तदान शिबिराची चर्चा मात्र सर्वत्र रंगली आहे कारण आजपर्यंत अशा प्रकारची भेटवस्तू देण्याची ही पहिलीच वेळ असेल.
बऱ्याचदा रक्तदान करणाऱ्या दात्याला काहीना काही भेटवस्तू दिल्या जातात. मग त्यामध्ये कुकर, पाण्याचा जार, पेन ड्राईव्ह, हेल्मेट अशा भेटवस्तू देत असतात. मात्र यावेळी मिळणाऱ्या भेटवस्तू चा फायदा लोकांच्या स्वास्थ्यासाठी देखील होणार आहे. त्यामुळे या रक्तदान शिबिराची चर्चा महाराष्ट्रभर होऊ लागली आहे
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम
Comments are closed.