माळशिरस तालुक्यातील ६९ शाळा सुरू; उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील

0

कोरोणाची दुसरी लाट आल्याने देशभरात कोरोना रुग्ण वाढताना दिसताहेत. गेल्या काही महिन्यांपासून शाळा तसेच महाविद्यालयं कधी पासून सुरू होणार? हा विषय खूप चर्चेत राहिला होता. केंद्र शासनाने शाळा सुरू करण्याबाबतचा निर्णय राज्यावर सोपवला होता. राज्य सरकारने हा निर्णय स्थानिक प्रशासनावर सोपवल्याने शाळा चालू होणार की नाही? या दुविधा मनस्थितीत विद्यार्थी तसेच पालक असल्याचे दिसून आले होते. मात्र आता खूप प्रतीक्षेनंतर अनेक भागांमध्ये शाळा सुरू झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

राज्य शासनाने शाळा सुरू करण्याबाबत घालून दिलेल्या गाईडलाईन्स प्रमाणे,माळशिरस तालुक्यामधील,पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या तब्बल 69 शाळा चालू झाल्या आहेत. अशी माहिती पंचायत समिती उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील यांनी दिली आहे.

पंचायत समिती माळशिरस अंतर्गत एकूण 80 शाळा येतात. त्यापैकी एकूण 69 शाळा चालू करण्याचे काम करण्यात आले आहे. तालुक्यातील शाळांमधील विविध भागातील शिक्षकांची कोरोणा चाचणी करुन जे शिक्षक निगेटिव आले आहेत,त्यांनाच शाळेत प्रवेश दिला गेला आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत शासनाने घालून दिलेले नियम पाळूनच शाळा सुरू करण्याचं काम करण्यात आलं असल्याचे,उपसभापती अर्जुंसिंह मोहिते पाटील यांनी पत्रकारांना सांगितले.

शासनाने घालून दिलेल्या नियमानुसार प्रत्येक वर्गात वीसच विद्यार्थ्यांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्याचबरोबर पालकांनी शिक्षण विभागावर विश्र्वास टाकल्याने सर्व पालकांचे तसेच विद्यार्थ्यांचे उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील यांनी आभार मानले आहेत.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.