बारामतीमधील खळबळजनक घटना; नगरसेवक, माजी सभापती अटकेत
बारामती शहरात सध्या गुन्ह्यांचे प्रकार दिवसेंदिवस वाढत चाललेले पाहायला मिळत आहेत. दिवसेंदिवस विकास होत असलेली बारामती व महाराष्ट्र राज्यात बारामतीच्या विकासाची चर्चा नेहमीच होत असते. मात्र या वाढत्या गुन्हेगारीचे प्रमाण देखील चिंताजनक आहे.
हल्ली सावकरकीच्या जाचामुळे अनेक लोक आत्महत्या करताना दिसत आहेत. लॉक डाऊन मध्ये संपूर्ण देशभर मंदी आल्यामुळे व्यवसाय सुध्दा तोट्यात गेले. आर्थिक व्यवहार ठप्प झाले होते. त्यामुळे सावकाराकडून घेतलेले कर्ज फेडणे लोकांना खूप अवघड झाले.
बारामती शहरामधील उद्योजक प्रीतम शशिकांत शहा यांनी सावकारी कर्जाने घेतले होते. त्यांनी घेतलेल्या पैशाच्या बदल्यात बंगला नावावर करून देण्यासाठी दबाव आणत असल्यामुळे व मानसिक त्रास दिल्यामुळे आत्महत्या केली. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी बारामती शहर पोलिसांनी एका नगरसेवकाला, माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती बारामती यांच्यासह 9 जणावरती गुन्हे दाखल केले आहेत. प्रीतम शशिकांत शहा यांचे चिरंजीव प्रतीक प्रीतम शाह यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार उद्योजक प्रीतम शहा यांना दिलेल्या पैशापोटी त्यांच्या नावावर असलेला बंगला नावावर करून देण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणला जात होता व सतत मानसिक त्रास होत असल्यामुळे त्यांनी आत्महत्या करण्याचा मार्ग अवलंबला. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी त्यांच्या त्यांच्या दुकानात एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्यांच्या मृत्यूनंतर काही दिवसांनी जेव्हा दुकान उघडले गेले तेव्हा दुकानात ही चिठ्ठी सापडली.
शहर पोलिसांनी जयेश उर्फ कुणाला चंद्रकांत काळे, नगरसेवक बबलू उर्फ जयसिंग काटे देशमुख , कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती संजय काटे यांच्यासह 9 जणांवर कारवाई केली आहे. महाराष्ट्र सावकारी अधिनियम 2014 कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी 3 जण वगळता सर्वांना अटक केली आहे.
आमच्या व्हॉटसअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://chat.whatsapp.com/EHaCcPIUAS716vCdMADhbR
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम