Malshiras: नावात पुजा, कामात दुजा; लाचखोर लोंढे बाईंचा वाजला बँड बाजा..
ठेकेदाराकडून लाच घेताना ग्रामसेविका पूजा लोंढेना ACB ने पकडलं रंगेहात..
Malshiras: माळशिरस तालुक्यातील ‘मोरोची’ (morochi) या गावामध्ये ”पूजा लोंढे’ नावाच्या एका महिला ग्रामविकास अधिकाऱ्याला काल बुधवारी शैलेश पवार (Shailesh pawar) या ‘एसीबी’च्या (ACB Solapur) अधिकाऱ्याने लाच घेताना रंगेहात पकडल्याची थक्कदायक बातमी समोर आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
सरकारी कामे निकृष्ट दर्जाचे होत असल्याच्या तक्रारी गेल्या काही वर्षांपासून सातत्याने समोर येत आहेत. कॉन्ट्रॅक्टर हा इस्टिमेटप्रमाणे काम करत नाही. किंवा निकृष्ट दर्जाची कामे करतो. हा आरोप कॉन्टॅक्टवर नेहमी केला जातो. संबंधित अधिकारी जर ठेकेदाराकडून टक्केवारीची मागणी करत असतील, तर कॉन्ट्रॅक्टरने कामे कशी करायची हा वास्तववादी प्रश्न फारसा चर्चेत येत नाही.
असाच एक प्रकार माळशिरस तालुक्यातील मोरोची या गावांमध्ये घडल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. पूजा बाबासाहेब लोंढे (Pooja londhe) असं या भ्रष्ट ग्रामविकास अधिकाऱ्याचे नाव असून, या महिला अधिकाऱ्याने ठेकेदार यांच्याकडे कामाची पाच टक्के रक्कम मागितल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
इन्स्टिमेंटप्रमाणे काम करूनही ग्रामविकास अधिकारी पूजा लोंढे बिल मंजूर करत नव्हत्या. कुठल्याही कामाचे सहा सात टक्के ग्रामसेवक घेतातच. तुम्ही मला पाचच टक्के द्या. तुम्ही केल्याल्या कामाची पाच टक्क्याने 45,500 रक्कम होते. ही रक्कम दिल्याशिवाय मी बिल काढू शकत नाही. अशा स्पष्ट शब्दात सांगत त्यांनी आमच्याकडे पैशाची मागणी केली. अशी माहिती महाराष्ट्र लोकशाहीशी बोलताना संबंधित कॉन्ट्रॅक्टरने दिली आहे.
शेवटी कंटाळून संबंधित कॉन्ट्रॅक्टरने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे या प्रकरणाची तक्रार केली. तक्रार आल्यानंतर काल बुधवार 18 फेब्रुवारीला ACB सोलापूरचे अधिकारी शैलेश चंद्रकांत पवार, पोलीस हवालदार सलीम मुल्ला, स्वामीराव जाधव, महिला पोलीस हवालदार प्रियंका गायकवाड, पोलीस हवालदार राहुल गायकवाड यांनी ग्रामविकास अधिकारी लोंढे यांना लाचेचा पहिला हप्ता 25,500 घेताना रंगेहात पकडले.
एसीबी पुणे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर पोलीस अधीक्षक अजित पाटील, एसीबी सोलापूर पोलीस अपाधीक्षक प्रशांत चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. गुन्ह्याचा तपास एसीबीचे रवींद्र लांभाते हे करीत असल्याची माहिती मिळाली आहे.
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम