Pune corporation election: निवडणुकीच्या तोंडावर पुण्यात राष्ट्रवादीला खिंडार; राष्ट्रवादी युवक काँग्रेस उपाध्यक्षांचा कार्यकर्त्यांसह राजीनामा..
Pune corporation election: राज्यातल्या महानगरपालिकांचा निवडणुक कार्यक्रम जाहीर झाला आहे. प्रत्येक पक्षाने आपापल्या परीने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. अशातच आता पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (sharad pawar) पक्षाला मोठा फटका बसला आहे. पुणे शहराचे युवक काँग्रेस उपाध्यक्ष नवनाथ शिंदे (Navnath Shinde) यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह पदाचा राजीनामा दिला आहे. स्थानिक आणि वरिष्ठ पातळीवर देखील निष्ठावंतांना सातत्याने डावलले जात असल्याने पक्षावर नाराज होऊन आपल्या पदाचा त्यांनी राजीनामा पक्षश्रेष्ठींकडे सुपूर्त केला आहे.
पुणे शहर युवक राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष नवनाथ शिंदे यांच्या राजीनाम्यामुळे शहरात पक्षाला मोठे नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिंदे यांच्या बरोबर ऋषिकेश भुजबळ, अक्षय पवार, प्रमोद नाडे, विकास काकडे, ऋतिक मोहिते, रोहित माळीसह अनेक कार्यकर्त्यांनीही पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्यामुळे पक्षाचे मोठे नुकसान होणार असल्याचं सांगितलं जातंय.
पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार) वेगवेगळे लढणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासाठी पुण्यात सत्ता खेचून आणणे मोठं आव्हान मानले जात आहे. पुणे शहर युवक काँग्रेस उपाध्यक्षसह कार्यकर्त्यांचे राजीनामे ही मोठी घडामोड मानली जात असून, यामुळे पक्षाला मोठं नुकसान होणार असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
पक्षावर नाराजी व्यक्त करताना नवनाथ शिंदे म्हणाले, “गेली १० वर्षे पक्षाचे एकनिष्ठतेने काम केले. पक्षाचा विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही जीवाचं रान केलं. सामान्याच्या प्रश्नाचे सोडवणूक करण्यासाठी आम्ही कुठेही तडजोड केली नाही. मात्र निष्ठावंतांना सातत्याने डावलले जात होते. त्यामुळे एकनिष्ठतेने काम करणारे कार्यकर्ते देखील नाराज होते. आपल्याला वेगळा निर्णय घ्यावा लागणार असल्याचा सुर कार्यकत्यांकडून सातत्याने समोर येत होता. आम्ही कार्यकर्त्यांची नाराजी स्थानिक आणि वरिष्ठ पातळीवर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडे वेळोवेळी पोहचवली होती. मात्र तरी देखील याची देखील घेतली गेली नाही.
पवार साहेबांच्या नेतृत्वात गेली दहा वर्ष आम्हाला काम करण्याची संधी मिळाली त्याबद्दल पक्षाचे आम्ही आभारी आहोत. पवार साहेब आमचे दैवत आहेत. मात्र स्थानिक पातळीवर कोणत्याही निर्णय प्रक्रियेत आम्हाला विचारात घेतले जात नाही. निष्ठांना डावलून प्रस्थापितांच्या मुलांनाच वेळोवेळी संधी दिली जाते. आमची ही नाराजी आम्ही वेळोवेळी वरिष्ठ पदाधिकाऱ्यांपर्यंत पोहचवली. मात्र तरीही काही बदल होणार नसेल. सन्मानाची वागणूक मिळणार नसेल, तर पक्षात राहून काहीही फायदा नाही. आणि त्यामुळे जड अंतकरणाने मला हा निर्णय घ्यावा लागत आहे. कार्यकर्त्यांना विचारात घेऊन आम्ही पुढचा निर्णय लवकरच घेणार असल्याचं नवनाथ शिंदे यांनी सांगितलं.
हे देखील वाचा Abhishek Ghosalkar Case: अभिषेक घोसाळकरांच्या हत्येचं धक्कादायक कारण समोर; मॉरिसने गोळ्या घालून स्वतःलाच का संपवले..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम