पुणे-पंढरपूर महामार्गाजवळ भीषण आग; धुरामुळे अपघातदृष्य परिस्थिती, प्रशासन मात्र कुंभकर्णाच्या झोपेत..

0

माळशिरस तालुक्यातील शिंगणापूर पाटी मांडवे बायपास रस्त्यालगत पुणे-पंढरपूर महामार्गावर आज सकाळी 11.30 च्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीमुळे मोठ्या प्रमाणावर धूर निर्माण झाला. हा धूर रस्त्यावर पसरला. मोठ्या प्रमाणात धूर रस्त्यावर पसरल्याने, वाहतुकीवर याचा गंभीर परिणाम झाला.

धुरामुळे रस्त्यावर दृश्यता शून्यावर आली होती. पुणे पंढरपूर महामार्ग आणि नातेपुते बायपासने प्रवास करणाऱ्या वाहनांना धुरामुळे समोरचे काहीच दिसत नव्हते. त्यामुळे रस्त्यावरील वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. काही ठिकाणी वाहनांनी अचानक ब्रेक लावल्याने अपघातदृष्य परिस्थिती देखील निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले.

सुदैवाने कोणताही मोठा अपघात झाल्याचे वृत्त अद्यापतरी समोर आलेले नाही. मात्र घटनास्थळी संबंधित प्रशासनाने लवकरात लवकर उपाययोजना करणे आवश्यक आहे. जेणेकरून रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या वाहनांना कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण नाही.

महाराष्ट्र लोकशाहीने प्रशासनाला संपर्क करण्याचा प्रयत्न केला, मात्र प्रशासनाकडून कोणताही रिस्पॉन्स मिळाला नाही.

आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. मात्र आग शेजारच्या गवताळ मोकळ्या जागेत लागली. ज्यामुळे त्याच्याशेजारी असणारे गवत आणि सुकलेल्या झाडांनी देखील पेट घेतला. त्यामुळे रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या वाहनांना आग आणि धुरामुळे मोठी अडचण निर्माण झाली.

शेतकरी राम शिंदे म्हणाले, आग कशी लागली माहीत नाही. आगीशेजारी माझा ऊस आहे. त्यामुळे मी ही आग विझविण्याचा प्रयत्न करत आहे. राम शिंदे नावाचे शेतकरी आगीच्या तांडवातून आपला ऊस वाचवण्याचा अतोनात प्रयत्न करतानचे दृश्य मन हेलवणारे होते.

पुणे पंढरपूर सारख्या मोठ्या आणि महत्त्वाच्या महामार्गावर एवढ्या मोठ्या प्रमाणात आग लागली असताना देखील प्रशासनाला याची कानोका खबर नाही, हे चित्र खूप भयानक आणि लाजिरवाणे आहे. या आगीची चौकशी होऊन संबंधित अधिकारी यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी अनेक वाहन चालकांकडून करण्यात आली.

स्थानिक प्रशासन, पोलीस आणि अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेणे आवश्यक होते. मात्र अद्याप घटनास्थळी संबंधित एकही प्रशासकीय अधिकारी, पोलीस, अग्निशामक दल, वाहतूक पोलीस कोणीही पोहोचलेलं नाही. त्यामुळे आता नागरिक मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त करताना दिसून येत आहेत.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.