Swargate ST Stand: नराधम दत्ता गाडेने बलात्कारापूर्वी देखील केलेत ‘हे’ काळे धंदे; अशी आहे त्याच्या घरची परिस्थिती…
नराधम गाडेला आज पोलिस न्यायालयात करणार हजर..
Swargate ST Stand: महाराष्ट्रामध्ये गेल्या काही महिन्यांपासून अनेक चित्र-विचित्र घटना पाहायला मिळत आहेत. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असूनदेखील गृहविभाग ठोस पाऊले उचलत नसल्याचा आरोप देखील सातत्याने होत आहे. अशातच आता माणुसकीला काळीमा फासणारी घटना स्वारगेट पोलिस स्टेशनपासून (swargate police station) 100 मीटर अंतरावर असणाऱ्या स्वारगेट एसटी स्टँडवर (swargate ST stand) घडली आहे.
एका 26 वर्षीय तरुणीवर शिवशाही बसमध्ये (shivshahi bus ) दत्ता गाडे (datta gade) या नराधमाने पहाटे 5:30 च्या morning 5:30am) सुमारास ब ला त्का रा ची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. आरोपी दत्ता गाडेला 70 तासानंतर अटक करण्यात आली असून, नराधमाला आज दुपारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. नराधम दत्ता गाडे विषयी आता अनेक धक्कादायक खुलासे समोर येऊ लागल्याने पुन्हा एकदा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
यापूर्वी देखील गाडेने केलेत..
आरोपी दत्ता गाडेने यापूर्वी देखील अनेक अमानवीय कृत्ये केली आहेत. त्याच्यावर अहिल्यानगर जिल्ह्यात अनेक गुन्हे दाखल देखील असल्याची माहिती आता समोर आली आहे. अगदी तो राहत असलेल्या शिरूर तालुक्यातील पोलिस ठाण्यामध्ये देखील त्याच्यावर गुन्ह्याची नोंद आहे. इतकंच काय स्वारगेट पोलिस स्टेशनमध्ये या नराधमावर मोबाईल चोरीचा गुन्हा देखील दाखल आहे.
असा करायचा कुकर्म..
दत्ता गाडे हा सराईत गुन्हेगार असून, यापूर्वी देखील त्याने अनेक कुकर्म केली आहेत. गाडे कोणताही कामधंदा करत नव्हता. झटपट श्रीमंत व्हायचं, ही मानसिकता दत्ता गाडेची होती. आणि याच मानसिकतेतून त्याने कर्ज काढून चारचाकी गाडी घेतली. पुणे ते अहील्यानगर रोडवर आपली चारचाकी गाडी घेऊन तो प्रवास करत असे. या प्रवासादरम्यान तो आपली शिकार हेरून महिलांना लिफ्ट द्यायचा.
ज्या महिलेच्या अंगावर बऱ्यापैकी दागिने असायचे अशा महिलांना तो आपल्या गाडीच बसवायचा. एकूण काय तर श्रीमंत महिलांना लिफ्टच्या किंवा पॅसेंजरच्या बहाण्याने आपल्या जाळ्यात ओढायचा आणि शिकार करायचा. आपल्या गाडीत बसवलेल्या महिलांना सुमसान ठिकाणी घेऊन जायचा आणि शस्त्राच्या साहाय्याने सोने, पैसे काढून घ्यायचा हाच त्याचा एकमेव उद्योग.
कोण आहे गाडे? कशी आहे घरची परिस्थिती?
दत्तात्रय रामदास गाडे असं या नराधमाचे संपूर्ण नाव आहे. शिरूर तालुक्यातील ‘गुनाट‘ हे गाडेचे मूळ गाव आहे. विशेष म्हणजे, गाडे हा विवाहित असून त्याला दोन मुलं देखील आहेत. गाडे कधीच एक किंवा दोन दिवसांपेक्षा जास्त दिवस घरी थांबत नसल्याची माहिती समोर आली आहे. गाडे हा नेहमी फिरत राहायचा. त्यामुळे त्याच्या या वागणुकीला त्याचे आई-वडील बायका -पोरं देखील कंटाळली होती.
गाडेच्या घरची परिस्थिती बेताची असून, त्याचे गुनाट गावामध्ये विट आणि पत्र्याचं घर आहे. गाडेला वडिलोपार्जित तीन एकर शेती असून, आई-वडील शेती पाहतात. शेती असूनदेखील तो शेतात काम न करता बाहेरच फिरत असायचा. शेती करून मोठं होता येत नाही, शेतीमध्ये फारसे पैसे नाहीत. असा त्याचा विचार होता. आणि हाच विचार त्याला वाईट मार्गावर घेऊन गेला. अगदी याच विचारामुळे तो आपण माणूस आहोत, हेही विसरून गेला. आणि जन्म दिला स्वारगेट बलात्कार घटनेला.
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम