दादा बघा माझी अवस्था; किरीट सोमय्यांचा चंद्रकांत पाटलांसमोर हंबरडा, चंद्रकांत पाटील म्हणाले…
संजय राऊत यांचे पार्टनर सुजीत पाटकर यांच्या लाइफलाइन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेस विरुद्ध तक्रार दाखल करण्यासाठी आज किरीट सोमय्या पुणे दौऱ्यावर असताना, शिवसैनिकांनी त्यांना धक्काबुक्की केल्याचा धक्कादायक प्रकार घडल्याचे पहिला मिळाले. या राड्यात किरीट सोमय्या पालिकेच्या पायरीवरून खाली पडल्याने, त्यांना चांगलाच मुक्का मार लागला असून, आता त्यांना संचेती हॉस्पिटलमध्ये दाखल देखील करण्यात आलं आहे.
शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करून किरीट सोमय्या आयुक्तांना भेटण्यासाठी महानगर पालिकेत जात असताना शिवसैनिकांनी त्यांना धक्काबुक्की केली. आणि या बाचाबाचीत किरीट सोमय्या पालिकेच्या पायऱ्यांवरून खाली पडल्याने जखमी झाल्याचे पाहायला मिळाले. पोलिसांनी लगेच किरीट सोमय्या यांना उचलून गाडीत बसवलं. किरीट सोमय्या यांच्यावर आता संचेती रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
किरीट सोमय्या यांना धक्काबुक्की केल्यामुळे, राज्यात भारतीय जनता पार्टी अत्यंत आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. या प्रकरणावर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली असून, हे खपवून घेतलं जाणार नसल्याचं म्हटलं आहे. एकीकडे लोकशाहीच्या गप्पा मारायच्या मात्र दुसरीकडे अशी मारहाण करायची,हे खऱ्या अर्थाने लोकशाहीला कालिंबा फासणारी घटना आहे असं भाजपकडून बोलण्यात येत आहे.
महाराष्ट्रात बंगाल सारखी परिस्थिती झाली असून, विरोधकांनी विरोधच करायचा नाही, ही पद्धत महाराष्ट्रात अवलंबली जात आहे. मात्र हे खपवून घेतले जाणार नाही, जशास तसे उत्तर द्यायला आम्ही देखील समर्थ आहोत. असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. एकीकडे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप होत असताना, दुसरीकडे मात्र किरीट सोमय्या यांना जबर मुक्का मार लागला असल्याचे डॉक्टरांनी म्हटले आहे.
संचेती हॉस्पिटलांच्या डॉक्टरांनी किरीट सोमय्या यांचा रक्तदाब वाढला असल्याचे देखील म्हटले असून, त्याच्यावर योग्य उपचार सुरू आहेत. असं देखील सांगण्यात आले आहे. भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी किरीट सोमय्याची हॉस्पिटलमध्ये जाऊन विचारपूस केली असून, त्यांना धिर दिल्याची माहिती मिळतेय. तर किरीट सोमय्या यांनी मात्र चंद्रकांत पाटलांना शिवसैनिकांनी माझी अवस्था काय केलीय बघा, असं बोलल्याचं कळतंय.
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम