धक्कादायक खुलासा..! शिवसेनेच्या ‘या’ बड्या नेत्यांच्या सांगण्यावरूनच ‘किरीट सोमय्यांवर हल्ला
संजय राऊत यांचे पार्टनर सुजीत पाटकर यांच्या लाइफलाइन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेस विरुद्ध तक्रार दाखल करण्यासाठी आज किरीट सोमय्या पुणे दौऱ्यावर आले होते. शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करून किरीट सोमय्या आयुक्तांना भेटण्यासाठी महानगर पालिकेत जात असताना शिवसैनिकांमध्ये आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. यात ते पायऱ्यांवरून खाली पडले, मात्र हा सुनियोजित कट रचला गेल्याच्या धक्कादायक खुलासा समोर आला आहे.
गेल्या काही महिन्यांपासून भाजपचे नेते किरीट सोमय्या शिवसेना नेत्यांच्या पाठीमागे हात धुऊन लागल्याचे पाहायला मिळत आहे. सुरुवातीला अजित पवारांवर भष्टाचाराचे आरोप केल्यानंतर सोमायानी आता आपला तापा शिवसेनेकडे वळवला. अनिल परब यांचे रिसॉर्ट हे बेकायदेशीर असून यात मोठा भष्टाचाराचे झाल्याचे आरोप सोमय्यानी केले. आणि आता त्यांनी संजय राऊत यांना टार्गेट केल्याचे पाहायला मिळत आहे.
संजय राऊत यांच्या कुटुंबाची मोठमोठ्या वाइन उद्योगात भागीदारी असल्याचा आरोप किरीट सोमय्या केला. फक्त आरोपच नाही तर, त्यांनी आज पुण्यात जंम्बो कोव्हीड सेंटरमध्ये भष्टाचार झाल्याची तक्रार देखील शिवाजीनगर पोलिस स्टेशनमध्ये दाखल केली आहे. सोमय्या वारंवार शिवसेनेवर हल्ला चढवताना पाहायला मिळेल असल्यानेच त्याबरोबरच अनेक नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत असल्यामुळेच त्यांच्यावर हल्ला झाल्याचे बोलले जात आहे.
एकीकडे शिवसेनेवर हा आरोप होत असला तरी, दुसरीकडे मात्र विरोधकांनी किरीट सोमय्या यांच्यावर शिवसेनेने केलेला हा हल्ला सुनियोजित कट होता. असा घणाघात करणारा मोठा वर्ग सोशल मीडियावर बोलताना पाहायला मिळतो आहे. किरीट सोमय्या यांच्या या हल्याचा सोशल मीडियावर निषेध केला जात असून, आता प्रकरणावर समिश्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
एकीकडे लोकशाहीच्या गप्पा मारायच्या मात्र दुसरीकडे अशी मारहाण करायची,हे खऱ्या अर्थाने लोकशाहीला कालिंबा फासणारी घटना आहे अशी भाजपकडून बोलण्यात येत आहे. एवढच नाही तर हे प्रकरण घडवण्याचा शिवसेनेचा पूर्वनियोजित कट होता. आणि हे संजय राऊत यांच्या सांगण्यावरून घडवलं गेले असल्याचे देखील बोलले जात आहे.
प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना म्हटले आहे, किरीट सोमय्या यांना संचेती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून ,त्यांचं फॅक्चर झालेलं आहे, की नाही हे पाहावे लागेल. लोकशाहीत प्रत्येकाला बोलण्यातचा, प्रदर्शन करण्याचा अधिकार आहे. मारामारी कशाला करता? असा सवाल देखील त्यांनी राज्य सरकारवर उपस्थित केला आहे. चंद्रकांत पाटील यांनी संचेती हॉस्पिटलमध्ये जाऊन किरीट सोमय्याची भेट घेतली असून, आता हे प्रकरण चंगेच चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम