बंडातात्या बोलले ते चुकीचं नाही; “जे काचेच्या घरात त्यांनी…,” चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याने खळबळ..
बंडातात्या कराडकर यांच्या वादग्रस्त विधानानंतर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देखील एक खळबळजनक विधान केल्याने, राज्याचे राजकारण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळत आहे. राज्य मंत्रिमंडळाने किराना आणि सुपर मार्केटमध्ये वाइन विक्रीचा निर्णय घेतला. आणि याच निर्णयाविरोधात काल साताऱ्यात व्यसनमुक्त युवक संघाच्या वतीने’दंडवत दंडुका’आंदोलन करण्यात होते. आंदोलन दरम्यान माध्यमाशी संवाद साधताना कराडकरांनी काही वादग्रस्त विधानं केल्याने, नवा वाद निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे.
राज्य सरकारने किराणा आणि सुपर मार्केटमध्ये दारू विक्रीचा घेतलेला निर्णय हा दुर्दैवी असून, तो महाराष्ट्रावर लादला गेला असल्याचं त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हटलं. या बरोबरच बंडातात्या कराडकर यांनी महाराष्ट्राच्या अनेक नेत्यांची मुलं दारू पिऊन रस्त्यावर पडतात, असे देखील विधान केलं. मात्र राज्य सरकारवर टीका करताना बंडातात्या कराडकर यांनी पातळी सोडल्याचे देखील पाहायला मिळाले.
सरकारवर टीका करताना, बंडातात्या कराडकर म्हणाले, राज्यातील अनेक नेत्यांची मुलं दारू पिऊन रस्त्यावर पडतात. हे बोलत असताना त्यांनी पंकजा मुंडे आणि सुप्रिया सुळे यांची नावं घेतल्याने, एकच खळबळ उडाली. एवढंच नाही तर, यासंदर्भातले पुरावेदेखील माझ्याकडे आहेत. असंही ते म्हणाले, मात्र सातारा पोलिसांनी बंडातात्या कराड यांच्यावर कबीराचे नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. राज्य महिला आयोगाने नोटीस पाठवली. आपल्यावर अटकेची टांगती तलवार असल्याचे लक्षात आल्यानंतर बंडातात्या कराडकर यांनी लगेच माफी देखील मागितली.
एकीकडे बंडा तात्या कराडकर यांनी या प्रकरणावर माफी मागितली असली तरी, मात्र चंद्रकांत पाटील यांनी यावर प्रतिक्रिया दिल्याने राज्यात पुन्हा एकदा नवा वाद निर्माण झाला आहे. आज दुपारी माध्यमांशी संवाद साधताना चंद्रकांत पाटील म्हणाले, बंडा तात्या कराडकर यांनी हे बोलाय पाहिजे होतं का नाही हे मला माहीत नाही. परंतु राजकारणात प्रत्येकाची घरे काचेची असतात, त्यामुळे आमच्यावर टीका करताना सांभाळून करा असा इशारा त्यांनी एकंदरीत बंडा तात्या कराडकर यांच्या प्रकरणाला धरून दिल्याचा अंदाज लावला जातोय.
एकीकडे बंडातात्या कराडकर यांनी केलेले विधान हे चुकीचं असल्याचं प्रत्येक जण मान्य करत आहे. एवढेच नाही तर स्वतः बंडातात्या कराडकर देखील माझ्याकडून चुकीचा वाक्य गेल्याने यापूर्वीच माफी मागितली आहे. दुसरीकडे मात्र,बंडातात्या कराडकर जे म्हणालेत, ते त्यांनी म्हणायला पाहिजे होतं का नाही, हे मला माहीत नाही, असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत. याचा अर्थ चंद्रकांत पाटील यांनी एक प्रकारे बंडातात्या कराडकर जे बोलले आहेत, त्याचं समर्थन केल्याच दिसून येत असल्याचं, सोशल मीडियावर बोललं जात आहे. चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यामुळे आता राज्यात नवा वाद निर्माण झाला असून, आता या प्रकरणाचे आणखीन तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम