कृषी कायदे मागे घ्या,गरीब कल्याण योजनेची मुदत वाढवा,तुम्ही काहीही करा; लोकांनी तुमची उचल बांगडी करायचं ठरवलंय..
2022 मध्ये पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका होणार असल्याने प्रत्येक पक्षाने आपली कंबर कसल्याचं पाहायला मिळत आहे. खास करून संपूर्ण देशाचे पंजाब आणि उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीकडे लक्ष लागून राहिले आहे. आणि या दोन राज्यात भाजपसाठी मोठं आव्हान मानलं जातंय. बेरोजगारी आणि महागाईवरून अगोदरच केंद्र सरकारवर चहुबाजूंनी टीका होत असताना पाहायला मिळत असतानाच, केंद्र सरकार व शेतकरी वर्ग देखील मोठ्या प्रमाणात नाराज असल्याचे चित्र देशभर पाहायला मिळत आहे.
नरेंद्र मोदी यांनी संसदेत तीन कृषी कायदे मंजूर केल्यानंतर या कायद्याच्या विरोधात देशभरातल्या शेतकरी ठिकाणी आंदोलन करत आहे. गेल्या वर्षभरापासून लोखोंच्या संख्येने शेतकरी या तीन कृषी कायद्याविरोधात आंदोलन करत आहेत. विशेष म्हणजे नरेंद्र मोदी यांनी शेतकरी विरोध करत असलेली तीन कृषी काय ते माघार घेत असल्याचे जाहीर केल्यानंतर देखील शेतकरी आंदोलन करत असल्याने केंद्र सरकारच्या अडचणी काही कमी होताना दिसत.
केंद्र सरकारने आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच तीन कृषी कायदे माघार घेतलं असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. नरेंद्र मोदी मंत्रिमंडळातील अनेक नेते आंदोलन करत असणारे शेतकरी नसून खालिस्तानी, देशद्रोही, असल्याचं म्हणत शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळल्याचे पाहायला मिळाले. एवढंच नाहीतर याच शेतकऱ्यांना नरेंद्र मोदी यांनी देखील हे शेतकरी नसून, आंदोलनजीवी आहेत,असं म्हटलं होतं. नरेंद्र मोदी यांच्या विधानानंतर अनेकांनी संताप देखील व्यक्त केला होता.
वर्षभरापासून कडाक्याच्या उन्हात थंडीत पावसात लाखोंच्या संख्येने तीन कृषी कायद्याविरोधात शेतकरी आंदोलन करत असताना नरेंद्र मोदी यांना शेतकऱ्यांविषयी काही वाटलं नाही मात्र आता आगामी विधानसभा निवडणुका आल्यानंतर आपला पराभव समोर दिसत असल्याने पंतप्रधानांना आल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे त्यातच आता गरिब कल्याण अन्नपुरवठा योजनाची तारीख देखील मार्च 2022 पर्यंत वाढवल्यामुळे नरेंद्र मोदी यांच्यावर पुन्हा टीका होत आहे.
गेल्या काही दिवसांपासून माध्यमांची रोज हेडलाईन बनलेले नवाब मलिक, यांनी नरेंद्र मोदींवर याच प्रकरणावरून जोरदार हल्ला चढवला आहे. शेतकरीविरोधी असणारे तीन कृषी काय तुम्ही मागे घेतले, आणि आता गरीब कल्याण अन्नपुरवठा योजनेची तारिख देखील वाढवरी. मात्र आता तुम्ही काहीही करा 2022 मध्ये होणाऱ्या देशभरातल्या निवडणुकांमध्ये तुमचा पराभव होणार हे निश्चित आहे, असा घणाघात नवाब मलिक यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर ट्विटरच्या माध्यमातून केला आहे.
२०२२ में ५ राज्यों में चुनाव हैं, आदरणीय प्रधान मंत्री मोदीजी ने ३ कृषि कानून वापस लिए और प्रधान मंत्री गरीब कल्याण अन्न योजना की अवधि भी मार्च २०२२ तक बढ़ा दी,
चुनाव जीतने के लिए कुछ भी कर लें, लेकिन हार तो निश्चित है.— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) November 25, 2021
नवाब मलिक यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना म्हटले आहे, तुम्ही तीन कृषी कायदे माघारी घ्या, किंवा गरीब कल्याण अन्न पुरवठा योजनेची तारीख वाढवा, तुम्ही निवडणुका जिंकण्यासाठी वाट्टेल ते करा, तुमचा पराभव निश्चित आहे. तुम्हाला सगळ्यांनी चांगलंच ओळखलं आहे. असा घणाघात नरेंद्र मोदींवर नवाब मलिक यांनी ट्विटरच्या माध्यमातून केला आहे. काही दिवसांपूर्वीच नरेंद्र मोदी यांनी शेतकर्यांनी विरोध केलेले तीन कृषी कायदे माघार घेत, असल्याची घोषणा केली. त्याचबरोबर आम्ही शेतकऱ्यांना हे कायदे समजून सांगण्यात कमी पडलो असल्याचं, म्हणत देशाची माफी देखील मागितली होती.
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम