२०२४ला शिवसेना ‘भाजप’सोबत जाणार असल्याचं स्पष्ट; शरद पवारांची खेळी त्यांच्याच अंगलट

0

2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात खूप मोठा राजकीय उलटफेर पाहायला मिळाला. तीन वेगवेगळ्या विचारधारेचे पक्ष एकत्र येऊन महाराष्ट्रात बीजेपीला सत्तेपासून दूर ठेवत, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी सत्ता स्थापन केली. किमान समान कार्यक्रमाच्या आधारावर हे तीन पक्षाचं सरकार महाराष्ट्रात अस्तित्वात आलं, आणि या सरकारला जवळ-जवळ दोन वर्षे पूर्ण देखील झाली. महाराष्ट्रात तिनं वेगवेगळ्या विचारधारेचे पक्ष एकत्र येऊन महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर, अनेकांनी आश्चर्य व्यक्त केल्याचं आपण वारंवार पाहिलं. मात्र आता एमआयएमचे अध्यक्ष ‘असदुद्दीन ओवेसी’ यांनी या सरकारवर टीका करत, मोठं भाकीत देखील केलं आहे.

2019 विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर सर्वाधिक भाजपचे 105 आमदार निवडून आले. शिवसेना आणि भाजप या दोन पक्षांनी 2019 ची विधानसभा एकत्र लढवली. मात्र निकालानंतर शिवसेनेने वेगळी भूमिका घेत, महाराष्ट्राच्या राजकारणात ट्वीस्ट आणल्याचे पाहायला मिळाले. निकाल लागल्याबरोबर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा शिवसेनाचा असेल,अशी भूमिका स्पष्ट केल्याने, देवेंद्र फडणवीस यांच्या अडचणीत वाढ झाल्याचे पाहायला मिळाले.

जर भारतीय जनता पार्टीला महाराष्ट्रात आपल्याला सोडून हे तिन्हीं पक्ष एकत्र येऊन सत्ता स्थापन करतील. असा अंदाज आला असता तर, त्यांनी शिवसेनेला मुख्यमंत्रीपद देखील देऊ केलं असतं. मात्र महाराष्ट्रातच काय पण देशभरातल्या एकाही जनतेला हे तिन्हीं वेगवेगळ्या विचारधारेचे पक्ष एकत्र येऊन, महाराष्ट्रात सत्ता स्थापन करतील असं कदापिही वाटलं नसेल. मात्र हे संजय राऊत आणि शरद पवार यांच्या मार्गदर्शन आणि विचारातून महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्याचे देशाने पाहिले. आणि भाजप मुंड्यावर कुचली.

महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन वेगवेगळ्या विचारधारेचे पक्ष एकत्र येऊन, सत्ता स्थापन करणार असल्याच्या चर्चा रंगत असतानाच, देवेंद्र फडणवीस यांनी देखील विचारधारेला वेशीवर टांगत, अजित पवारांबरोबर एक दिवसाचं सरकार स्थापन केल्याचा, अजब प्रकार देखील महाराष्ट्राने पाहिला. पुढे अजित पवारांबरोबर एकही आमदार गेला नसल्यामुळे,हे सरकार कोसळले, आणि महाविकास आघाडी सरकार महाराष्ट्रात अस्तित्वात आलं.

अजित पवारांबरोबर देवेंद्र फडणवीस यांनी एक दिवसाचं सरकार स्थापन केल्यामुळे, महाविकास आघाडीचे सरकार महाराष्ट्रात अस्तित्वात आल्यानंतर देखील, भारतीय जनता पार्टीला टीका करता आली नाही. महाविकास आघाडीचे सरकार महाराष्ट्रात अस्तित्वात आल्यानंतर, भारतीय जनता पार्टीला टीका करता आली नसली तरी मात्र, एमआयएमचे असदुद्दीन ओवेसी यांनी या तिन्ही वेगवेगळ्या विचारधारेच्या पक्षांवर सडकून टीका केली आहे, शिवाय त्यांनी शिवसेनेविषयी एक मोठं भाकीत केल्याने, एकच खळबळ उडाली आहे.

असदुद्दीन ओवेसी यांनी सोलापुरात कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना, या तिन्हीं पक्षांवर टीका करताना शिवसेनेच्या हिंदुत्वावर तर राष्ट्रवादी आणि काँग्रेस या दोन पक्षांच्या धर्मनिरपेक्षतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत हल्लाबोल केला. कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना, असदुद्दीन ओवेसी यांनी तीन वेगवेगळ्या विचारधारेचे पक्ष एकत्र येऊन सरकार कसं काय स्थापन करू शकतात? असा प्रश्न देखील उपस्थित केला.

एका जातियवादी पक्षाला तुम्ही सत्तेवर बसवत आहात, आणि स्वतः धर्मनिरपेक्षतेच्या गप्पा मारता. धर्मनिरपेक्षितता म्हणजे काय गंमत आहे? तिन्हीं पक्ष आपापल्या फायद्याचं राजकारण पाहात असल्याचा आरोप देखील असदुद्दीन ओवेसी यांनी केला. या आरोपाबरोबरच त्यांनी शिवसेनेविषयी देखील मोठं भाकीत केलं आहे. २०१४च्या लोकसभा आणि विधानसभेला शिवसेना भाजपसोबत जाणार असल्याचं भाकित देखील, असदुद्दीन ओवेसी यांनी केलं.

असदुद्दीन ओवेसी यांनी शिवसेनेविषयी केलेल्या या भाकीतामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाल्याचं पहिला मिळत आहे. शिवसेना आणि भाजप यांचे सध्याचे संबंध पाहिले तर, हे दोन्हीं पक्ष भविष्यात एकत्र निवडणुका लढतील, असे चित्र सध्या तरी दिसताना पाहायला मिळत नाही, मात्र ओवेसी यांनी केलेल्या भाकीतामुळे सध्या लोकांच्या मनात एकच खळबळ माजली आहे.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.