Nawab Malik: होय मी भंगार’वाला’! या शहरातलं सगळं भंगार भट्टीत टाकून पाणी केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही,एकाचं तर..
आर्यन खान ड्रग्स प्रकरण ‘फेक’ असून कार्डिलिया क्रुझ ड्रग्स प्रकरणावर कारवाई करणारा माणूस ‘समीर वानखेडे’ हा देखील ‘फेक’ असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) सुरुवातीपासूनच करत होते. एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे (Sameer wankhede) यांच्या विरोधात रोज नवनवीन खुलासे करत नवाब मलिक यांनी हे प्रकरण चांगलंच गाजलवलं. काल आर्यन खानला मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर नवाब मलिक यांनी संध्याकाळी आपल्या ट्विटरवरून “पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त” असं ट्विट करत, समिर वानखडे यांना पुन्हा,डिवचल्याचे दिसून आलं
आर्यन खान ड्रग्स प्रकरणात काल अनेक महत्त्वाच्या गोष्टी घडल्या. मुंबई उच्च न्यायालयाने 2 ऑक्टोंबर पासून न्यायालयीन कोठडीमध्ये असणाऱ्या शाहरुख खानच्या मुलाला काल मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. त्याचबरोबर या प्रकरणाचा स्वतंत्र साक्षीदार आणि आर्यन खानच्या हाताला पकडून एनसीबी ऑफिसमध्ये घेऊन जाणाऱ्या किरण गोसावी याला देखील पुणे पोलिसांनी अटक केली. तर दुसरीकडे या प्रकरणाचा तपास करत असणारे, एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांची देखील एनसीबीकडून चौकशी करण्यात आली.
त्याचबरोबर पोलीस अटक करतील, या भीतीने समीर वानखेडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात एक याचिका देखील दाखल केली होती, त्यावर कालच सुनावणी झाली. आणि मुंबई उच्च न्यायालयाने समीर वानखेडे यांना अटक करायची असेल तर 72 तास अगोदर त्यांना समजू द्या, असं मुंबई पोलिसांना सांगितले. या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी एक पत्रकार परिषदेत घेतली.
मलिक यांची ही पत्रकार परिषद चांगलीच गाजलीच गाजल्यांच पाहिला मिळाली. या पत्रकार परिषदेत जो व्यक्ती आर्यन खानला जेलमध्ये घेऊन चालला होता, आज त्याला जेलमध्ये जाव लागलं. आर्यन खान ड्रग्स प्रकरणाचा तपास करत असणारा अधिकारी अटक होऊ नये म्हणून आता कोर्टाच्या पायऱ्या चढू लागलाय. हे सगळं सत्य असलं तरी,अजूनही हे प्रकरण थांबलं नसून, या प्रकरणात आणखी काही धक्कादायक खुलासा येणार असल्याचं नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.
भाजपचे नेते मोहित कंबोज तुमच्यावर १०० कोटी रुपयांचा दावा करणार आहेत. पत्रकार परिषदेत पत्रकाराने विचारलेल्या या प्रश्नाचे उत्तर देताना नवाब मलिक म्हणाले, माझी सगळी संपत्ती विकली तरीही शंभर कोटी जमा होणार नाहीत. मला मोहित कंबोज, तो “भंगारवाला”आहे असं म्हणाले. होय मी ‘भंगारवाला’ आहे. आणि मला त्याचा अभिमानही आहे. माझे वडील भंगाराचा आणि कपड्याचा व्यवसाय करत होते. असंही या पत्रकार परिषदेत ते म्हणाले.
मी सोळा वर्षाचा असल्यापासून ते आमदार होईपर्यंत भंगाराचा व्यवसाय करत होतो. मात्र मी कधीही gold Smuggling केलं नाही. मी कधी चोऱ्या केल्या नाहीत. माझा कधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिलेला चेक बाउन्स झाला नाही. अशी टीका नवाब मलिक यांनी भाजपचे नेते ‘मोहीत कंपोज’ यांच्यावर केली. या पत्रकार परिषदेत त्यांनी बोललेली काही वाक्य प्रचंड गाजत आहेत.
होय मी भंगारवाला आहे.भंगारवाल्याची किमयागिरी काय असते हे या लोकांना माहिती नाही.जी वस्तू उपयोगी नसते ती उचलून आणतो.त्याचे तुकडे करुन पाणी करण्याचं काम भंगारवाला करतो.मी या शहरात जेवढे भंगार आहेत,त्यांचे एकएक नट बोल्ट काढून भट्टीत टाकणार आहे आणि यांचं पाणी केल्याशिवाय थांबणार नाही pic.twitter.com/u8YTgUdqpY
— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) October 29, 2021
“होय मी भंगारवाला आहे” परंतु भंगारवाल्याची किमया काय असते? हे त्यांना अजून माहीत नाही. भंगारवाल्याचं काम हे वेस्ट झालेला माल एकत्रित करून, त्याचे तुकडे करून भट्टीत टाकायचं आणि त्याचं पाणी काढायचं काम भंगारवाला करतो. आणि मी सुद्धा या शहरात जेवढे भंगारवाले आहेत, त्या सगळ्यांना एकत्र करून तुकडे करून, भट्टीत टाकून त्याचे पाणी केल्याशिवाय नवाब मलिक स्वस्थ बसणार नाही, असा घणाघात नवाब मलिक यांनी अप्रत्यक्ष भाजपच्या नेत्यांवर केला आहे.
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम