नवाब मलिक यांचा दावा ठरला खरा; समीर वानखेडेंचे खरे नाव समीर ‘दाऊदच’…

0

आर्यन खान ड्रग्स प्रकरणाचा तिढा काही सुटता सुटेना, दिवसेंदिवस एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप होत असून हे प्रकरण आता भलतीकडेच गेल्याचे पाहायला मिळत आहे. 2 ऑक्टोंबरला एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांनी कार्डिलिया क्रुझवर छापा टाकत, शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला ड्रग्स प्रकरणात अटक केली. अद्याप या प्रकरणात आर्यन खानला जामीन मंजूर झालेला नाही. सत्र न्यायालयाने आर्यन खान चा जामीन दोन वेळा फेटाळल्यानंतर आज मुंबई उच्च न्यायालयानेत त्याच्या जामिनावर सुनावणी सुरू आहे.

आर्यन खान प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे समोर आल्यानंतर, या प्रकरणाने वेगळेच वळण घेतल्याचे पाहिला मिळाले. सुरुवातीला या प्रकरणाचा स्वतंत्र साक्षीदार असणारा प्रभाकर साहिल याने या प्रकरणाचे काही धक्कादायक खुलासे केलाने सर्वत्र खळबळ उडाली. या प्रकरणाचा तपास करत असणारे सीबीआयचे जोहरी अधिकारी समीर वानखेडे यांनी आर्यन खान प्रकरणात आठ कोटी रुपये मिळणार असल्याचा धक्कादायक खुलासा करत प्रभाकर साईल यांनी खळबळ माजवून दिली.

राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक हे आर्यन खान प्रकरणात सुरूवाती पासूनच समीर वानखेडे यांच्यावर सातत्याने हल्ला करत होते. हे प्रकरण फेक असल्याचे सांगत ते रोज नवीन नवीन पुरावे समीर वानखेडे यांच्या विरोधात ट्विटरवर सादर करत होते. मात्र ते राजकारणाशी संबंधित असल्यामुळे त्यांच्या आरोपाला फारसं महत्त्व दिलं गेलं नाही. परंतु या प्रकरणाचा स्वतंत्र साक्षीदार असणारा प्रभाकर साईल याने केलेल्या गंभीर आरोपांमुळे, मलिक यांच्या आरोपाला देखील महत्त्व आल्याचं दिसून आलं.

नवाब मलिक यांनी काल समीर वानखेडे यांचं जात प्रमाणपत्र आपल्या ट्विटरवर शेअर केलं. जात प्रमाणपत्र मध्ये समीर वानखेडे यांचे नाव समीर वानखेडे असं असल्याचं दिसून आलं. आणि एका नव्या वादाला तोंड फुटलं. समीर वानखेडे यांनी आपल्या जातीची खोटी कागदपत्रे सादर करत ही नोकरी मिळवली असल्याचं नवाब मलिक यांनी एक पत्रकार परिषद घेऊन जाहीर केलं. आणि आर्यन खानवरचा फोकस हटत समीर वानखेडेंकडे वळला.

नवाब मलिक यांनी केलेला आरोपांचे खंडन करत समीर वानखेडे यांनी देखील त्याला जशास तसे प्रत्युत्तर दिले. आणि आपली दोन लग्न झाली असल्याचं,जाहीर केलं. त्याच सोबत माझ्या वडिलांचे लग्न एका मुस्लीम महिलेशी झालं असून, माझी ती आई आहे. असंही समीर वानखेडे यांनी कबूल केलं. मात्र मी जात प्रमाणपत्रात कसलीही छेडछाड केली नसून, नोकरी मिळवण्यासाठी मी कोणतेही गैरकृत्य केले नसल्याचा खुलासा केला.

समीर वानखेडे यांनी मी माझ्या आईच्या इच्छेखातर पहिले लग्न मुस्लिम पद्धतीने केलं असल्याचं माध्यमांशी संवाद साधताना समीर वानखेडे सांगितलं होतं मात्र आता एक धक्कादायक प्रकार समोर आला असून,समीर वानखेडे यांच्या अडचणी पुन्हा एकदा वाढल्या आहेत. वानखेडे यांचे पहिले लग्न(निकाह) लावून देणाऱ्या, मौलाना मुजम्मिल अहमद यांनी आता या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली असून समीर वानखेडे हे खोटे बोलत असल्याचा त्यांनी दावा केला आहे.

समीर वानखेडे यांचा पहिले लग्न (निकाह)मी लावून दिलं आहे. पहिले लग्न करताना ते मुस्लीम होते. जर ते मुस्लिम नसते तर हे लग्न झालं नसतं, असाही दावा मौलाना मुजम्मिल अहमद यांनी एका माध्यमांशी संवाद साधताना केला आहे. लावताना त्यांनी एक फॉर्म भरला होता त्या फॉर्मवर त्यांनी समीर दाऊद असंच नाव लिहिलं असल्याचं मला मला आठवतं, असा धक्कादायक खुलासा मौलाना मुजम्मिल अहमद यांनी केला आहे.

मौलाना मुजम्मिल अहमद यांनी केलेल्या या दौऱ्यानंतर आता समीर वानखेडे यावर काय प्रतिक्रिया देतात? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले असून, आर्यन खान ड्रग्स प्रकरणाने आता वेगळेच वळण घेतले असून, समीर वानखेडे यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढतच चालल्याचे दिसून येत आहे.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.