‘पोलीस आपल्या दारी’ कार्यक्रमांतर्गत पोलीस’उपनिरीक्षक’ मुलींना ‘असं’ काय म्हणाले? ज्यामुळे होतंय त्याचं कौतुक
मोहोळ: ‘पोलीस आपल्या भेटीला’ या कार्यक्रमांतर्गत ‘मोहोळ’ तालुक्यातील शिरापुरमधील ‘अंबिका विद्या मंदिर’ प्रशालेला मोहोळ पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक खरगे यांनी आज भेट दिली. ‘पोलीस आपल्या भेटीला’ या कार्यक्रमांतर्गत विविध विषयांवर आपली मते मांडत असताना त्यांनी पोलीस करीत असलेल्या समाजहिताच्या कार्याचीही ओळख करून दिली.
‘पोलीस आपल्या भेटीला’ या कार्यक्रमांतर्गत विविध विषयावर बोलताना ‘खरगे’ यांनी मुलींच्या असुरक्षिततेच्या प्रश्नांकडे विशेष लक्ष वेधले. मुलींनी आपल्या आवडत्या क्षेत्राकडे लक्ष केंद्रित करून यश मिळवलं पाहिजे. समाजात मुली संदर्भात ज्या काही घटना घडतात, त्याविषयी त्यांनी आपले आई-वडील, शिक्षकांना मनमोकळ्या पणाने बोललं पाहिजे. कोणाच्याही दबावाला बळी न पडता मुलींनी आपलं आयुष्य जगलं पाहिजे. असा मोलाचा सल्ला या शाळेतील विद्यार्थिनींना उपनिरीक्षक ‘खरगे’ यांनी दिला.
समाजात सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलीस ताकतीने काम करत आहेत. समाजात शांतता आणि सुरक्षितता राखण्यासाठी आम्ही सर्वतोपरी काम आणि मदत करण्यासाठी तुमच्या सेवेसाठी तत्पर आहोत. पोलीस नेहमी आपल्याबरोबर आहेत. असंही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले. त्याचबरोबर शाळेतील सीसीटीव्ही कॅमेरे चालू आहेत, तक्रार पेटी आहे, त्याचा नियमित वापर होतोय, हे पाहून छान वाटतंय. शेवटी असं म्हणत त्यांनी आपलं मनोगत संपवलं.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चव्हाण सर यांनी केले. तर या प्रशालेचे मुख्याध्यापक बी.जी कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन गावातील सामाजिक कार्यकर्ता अनिल पाटील यांनी केलं होते. त्याचबरोबर या कार्यक्रमात संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष ‘महेश मसलकर’ यांनी उपस्थिती लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम
Comments are closed.