पंढरपूरचे आमदार भारत भालके यांचे निधन
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पंढरपूर येथील आमदार भारत भालके हे पुण्यामधील रुबी हॉल रुग्णालय येथे उपचार घेत होते . काल आमदार भारत भालके यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे तेथील डॉक्टरांकडून सांगण्यात आले होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी देखील हॉस्पिटलमध्ये जाऊन आमदार भालके यांची भेट घेतली होती.
शरद पवार यांनी भालके यांची भेटी घेतल्यानंतर शरद पवार यांना भालके यांच्या प्रकृतीबाबत विचारले असता शरद पवार म्हणाले होते की, त्यांच्या प्रकृती बाबत डॉक्टरांना विचारा असे शरद पवार यांनी पत्रकारांना सांगितले. आमदार भारत भालके यांच्याबाबत रुबी हॉल हॉस्पिटल चे संचालक डॉ. परवेझ ग्रँट म्हणाले की, “आमदार भारत भालके यांची प्रकृती अतिशय चिंताजनक आहे असे म्हटले होते.
तसेच त्यांना पोस्ट कोविडमुळे खूप त्रास होत होता. त्यावर उपचार सुरू होता त्यांची ऑक्सिजन पातळी खालावली होती. तर त्यांना व्हेंटिलेटर लावण्यात आले होते. आमची टीम लक्ष ठेऊन आहे” असंही डॉक्टरांनी सांगितले होते. उपचारांना त्यांच्या प्रकृतीने प्रतिसाद न दिल्यामुळे अखेर शुक्रवारी भारत भालके यांची प्राणज्योत मालवली.
भारत भालके हे सोलापूरच्या राजकारणातील महत्वाचे नेते होते. आमदार भारत भालके तिसऱ्यांदा पंढरपूर विधानसभा निवडणुकीत विजय मिळवून आमदार झाले होते. मात्र तिन्ही वेळा ते वेगळ्या पक्षातून आमदार भालके निवडून आले होते. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भारत भालके यांनी काँग्रेस ला रामराम ठोकून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केला. ते भाजपमध्ये जाणार अशा देखील चर्चा रंगल्या होत्या.
2019 च्या विधानसभा निवडणुकीमध्येब भारत भालके यांनी तिसऱ्यांदा आमदार होवून विजयाची हॅटट्रिक केली. ऑक्टोबर महिन्यामध्ये आमदार भारत भालके यांची कोरोंना चाचणी पोझिटिव आली होती. उपचारानंतर भालके यांना घरी सोडण्यात आलं होतं. मात्र गेल्या आठवड्यापासून आमदार भालके यांची प्रकृती पुन्हा ढासळली. त्यानंतर आमदार भारत भालके यांना पुणे येथील रुबी रुग्णालयामध्ये भर्ती करण्यात आले होते. भालके यांना किडनी आणि मधुमेहाचा त्रास देखील होत होता.
भारत भालके यांचे वय 60 वर्ष होते. तुमच्या पाच्छात पत्नी, मुलगा आणि तीन विवाहित मुली असा परिवार आहे. सकाळी पंढरपूर येथील सर्कोली येथे अंत्यसंस्कार होतील अशी माहिती मिळत आहे.
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम
Comments are closed.