नक्षलवादी भागातील पोलिसांसोबत गृहमंत्र्यांनी साजरी केली दिवाळी!

0

दिवाळी हा सण प्रत्येकाच्या आवडीचा आणि खूप आनंदाचा विषय म्हणून ओळखला जातो.

दिवाळी म्हटलं की, नवीन कपडे, दागिने नवनवीन पदार्थ, फटाके अशा अनेक गोष्टी आपल्याला डोळ्यासमोर दिसतात.

दिवाळीत प्रत्येक जण आपल्या कुटुंबासोबत आनंदात वेळ घालवताना पाहायला मिळतो. मात्र प्रत्येकाच्या नशिबी दिवाळी साजरी करणं नसतं, हे ही तितकंच खरं आहे. भारतीय जवान,पोलीस या लोकांना दिवाळी आली काय?आणि गेली काय? याचा काहीही फरक पडत नाही. भारतीय जवान सीमेवर देशाचे रक्षण करण्यासाठी तटस्थ असतात. ते भावनेपेक्षा कर्तव्याला जास्त महत्त्व देतात. आणि म्हणूनच आपण आनंदात दिवाळी साजरी करतो. या आनंदाच्या क्षणात आपण त्यांना शुभेच्छा देणे,आठवण काढणं खूप गरजेचं असतं.

पोलीस दलाचे प्रमुख, महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या गोष्टीच भान ठेवत गडचिरोली या नक्षलवादी भागातील पोलिसांसोबत दिवाळी साजरी केली. त्याचबरोबर त्यांच्या कर्तव्य निष्ठेचे कौतुकही केले. ही माहिती त्यांनी आपल्या ट्विटर अकाउंट करून दिली आहे.

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपल्या पत्नीसह नक्षलवादी भागातील गडचिरोली पोलीसांसोबत आपली दिवाळी साजरी केली. त्याचबरोबर पोलिसांच्या अडचणी समजून घेऊन सरकार सदैव पोलिस दलाच्या पाठीशी असल्याची ग्वाही देखील त्यांनी दिली. दिवाळीमध्ये प्रथमच गृहमंत्री आल्याने पोलीसांमध्ये देखील उत्साह असल्याचे दिसून आले.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.