मराठा आरक्षण सुनावणीला सरकारचे वकील खरंच गैरहजर होते?
गेले काही महिने मराठा आरक्षण विषय हा खूप चर्चेचा विषय राहिला आहे. नऊ सप्टेंबरला ज्या खंडपीठाने या आरक्षणाला स्थगिती दिली होती,काल त्याच खंडपीठासमोर मराठाo morning dew आरक्षणाची सुनावणी झाली.
सुनावणी सुरू असताना मराठा समाजाचे नेते विनोद पाटील यांच्या वकिलांनी मराठा आरक्षण या प्रकरणाची पाच न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर सुनावणी व्हावी,अशी भूमिका मांडली.
मराठा आरक्षण संदर्भात काल झालेल्या सुनावणीच्या वेळी सरकारचे वकील गैरहजर होते,हे खूप दुर्दैवी आहे,असं छत्रपती संभाजीराजे यांनी म्हटलं आहे. मात्र राज्य सरकारचे वकील गैरहजर नसून ते उशीरा आले होते ही वस्तुस्थिती आहे.
राज्य सरकारचे वकील अॅड. मुकुल रोहतगी हजर झाल्यानंतर मराठा समाजाचे नेते विनोद पाटील यांचे वकील अॅड. संदीप देशमुख आणि अॅड. रोहतगी या दोघांनी मराठा आरक्षण हे प्रकरण पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे देण्यात यावे अशी मागणी केली.
मराठा आरक्षणवर लावलेल्या स्थगितीवरील सुनावणी आता न्यायालयाने चार आठवडे प्रलंबित ठेवली आहे.
मराठा आरक्षण हे प्रकरण, सध्या
न्या. एल. एन. राव,न्या. हेमंत गुप्ता त्याचबरोबर न्या. अजय रस्तोगी या तीन खंडपीठासमोर सुरू आहे.
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम