Sharad Pawar: ‘खाऊन फुकटचं घबाड, वाकडं झालं तुझं थोबाड..’; केतकीने केलेली विकृत कविता वाचून तुमचाही होईल संताप..

0

Sharad Pawar: छोट्या पडद्यावरील अभिनेत्री केतकी चितळे (ketki chitale! ही नेहमी सोशल मीडियावर वादग्रस्त व्हिडिओ आणि पोस्ट टाकत चर्चेत राहण्याचा प्रयत्न करत असते. यामुळे तिला मोठ्या प्रमाणात ट्रोल देखील करण्यात येते. मात्र तरीदेखील सगळ्यांना झुगारून, ही छोट्या पडद्यावरील अभिनेत्री आपल्या विकृतीचे दर्शन नेहमी करताना पाहायला मिळते. आता पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर नितीन भावे (Nitin Bhave) यांनी केलेली वादग्रस्त आणि विकृत कविता केतकी चितळेने आपल्या फेसबुक अकाउंटवरून पोस्ट केल्याने, राष्ट्रवादी (NCP) चांगलीच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी साताऱ्यात (Satara) झालेल्या सभेत ‘जवाहर राठोड’ (jawahar rathod) यांची ‘डोंगराचे ढोल’ या संग्रहातील ‘पाथरवट’ ही कविता उपस्थित लोकांना म्हणून दाखवली. पवार यांनी म्हटलेल्या कवितेवर भाजपने (BJP) देखील टीका केली. वास्तविक पाहता शरद पवार यांनी सादर केलेल्या कवितेचा आणि ध र्मा चा काहीही संबंध नसताना भारतीय जनता पार्टीने याचा थेट संबंध ध र्मा शी जोडत पवारांवर टीका केली. यानंतर छोट्या पडद्यावरील अभिनेत्री केतकी चितळे हिने देखील शरद पवार यांच्यावर एडवोकेट नितीन भावे यांची कविता आपल्या फेसबुक अकाउंटवरून पोस्ट केली आणि या विकृतीचे दर्शन घडवले.

भारतीय जनता पार्टीने शरद पवार यांच्यावर टीका केल्यानंतर, या प्रकरणात केतकी चितळे हिने देखील उडी घेतली. केतकी चितळे हिने शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह पोस्ट करताना म्हटले आहे, तुका म्हणे पवारा, नको उडवू तोंडाचा फवारा, ऐंशी झाले आता उरक, वाट पाहतो नरक, अशा अनेक विकृत ओळींची कविता तिने आपल्या फेसबुकवरून पोस्ट केली. तीने पोस्ट केलेली कविता सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली आहे. विशेष म्हणजे ही कविता जवळपास दोन हजाराहून अधिक जणांनी लाईक केली असून,‌ 76 जणांनी शेअर देखील केली आहे. केतकी चितळे वेगवेगळ्या विषयावर आपली मते मांडत असते. मात्र आता तिने शरद पवार यांच्यावरच विकृत टीका केल्याने केतकी चांगलीच अडचणीत आली आहे.

ही आहे केतकी चितळेने पोस्ट केलेली विकृत कविता “तुका म्हणे पवारा, नको उडवू तोंडाचा फवारा, ऐंशी झाले आता उरक, वाट पाहतो नरक, सगळे पडले उरले सुळे, सतरा वेळा लाळ गळे, समर्थांचे काढतो माप, ते तर तुझ्या बापाचेही बाप, ब्राह्मणांचा तुला मत्सर, कोणरे तू ? तू तर मच्छर भरला तुझा पापघडा, गप नाही तर होईल राडा, खाऊन फुकटचं घबाड, वाकडं झालं तुझं थोबाड, याला ओरबाड त्याला ओरबाड, तू तर लबाडांचा लबाड” केतकी चितळेने पोस्ट केलेली ही कविता अॅडव्होकेट नितीन भावे यांची असून, तीने आपल्या फेसबुक अकाउंटवरून पोस्ट केली आहे.

गु न्हा झाला दाखल

शरद पवार यांच्यावर केलेल्या विकृत कवितेमुळे केतकी चितळेवर विविध ठिकाणी गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. कळवा पोलीस राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक शहर अध्यक्ष स्वप्नील नेटके यांच्या सांगण्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शरद पवार यांची बदनामी आणि मानहानी करणारी पोस्ट केतकीनं केली असल्याचं तक्रारीत म्हटलं आहे. ‘नेटके’ यांनी देलेल्या तक्रारीनुसार, कळवा पोलीसांनी केतकी चितळे यांच्या विरोधात कलम ५०५(२), ५००,५०१, १५३ ए नुसार गुन्हा दाखल केला आहे.

या आधीही केतकी आली होती चर्चेत.

केतकी चितळेची सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट करण्याची ही पहिलीच वेळ नाही. या पूर्वीही तिने अनेक विषयांवर नेहमी वादग्रस्त विधान केले आहे. एवढेच नाही, तर केतकी चितळे हिने यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल देखील वादग्रस्त पोस्ट केली होती. यामुळे शिवप्रेमींनी तिला मोठ्या प्रमाणात ट्रोल देखील केलं होतं. आता पुन्हा एकदा केतकी चितळे हिने शरद पवार यांच्यावर केलेल्या विकृत टीकेनंतर चांगलीच चर्चेत आली असून, अनेक कलमांतर्गत गुन्हा दाखल झाल्याने तिच्या अडचणीत मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे.

राष्ट्रवादीच्या महिला नेत्या रूपाली पाटील ठोंबरे यांनी देखील केतकी चितळे यांच्यावर जोरदार टीका केली असून, त्यांना घरी जाऊन चोप देणे गरजेचे असल्याचं म्हटले आहे. आम्हाला केतकी चितळे या मानसिक रुग्ण असून, त्यांच्यावर स्टेटमेंट चालू असल्याची माहिती मिळाली आहे. यापूर्वी तीने अनेक वेळा सोशल मीडियाच्या माध्यमातून वेगवेगळी विकृत मते मांडली. त्यांना त्याच पद्धतीने ट्रोल देखील करण्यात आले. मात्र पवार साहेब यांच्यावर तिने ओकलेली गरळ पाहता, तिला घरी जाऊन चोप देणे, गरजेचे असल्याचं रूपाली पाटील ठोंबरे माध्यमांशी बोलताना म्हणाल्या.

हे देखील वाचाWhatsApp: व्हाट्सअप वर चूकूनही ‘हे’ मेसेज पाठवू नका, अन्यथा खाली लागेल जेलची हवा..

RCBvPBKS: बंगलोरच्या दारुण पराभवानंतर IPL 2022 चे समीकरण झाले स्पष्ट; हे चार संघ जाणार प्ले ऑफमध्ये..

Post office Scheme: आता पोस्ट ऑफिस खातेधारकांना मिळणार १३००० महिना; तुम्हीही घेऊ शकता लाभ जाणून घ्या सविस्तर..

Agriculture: केंद्र सरकारचा ऐतिहासिक निर्णय! पीएम किसान लाभार्थ्यांना आता सहा ऐवजी अकरा हजार मिळणार..

second hand bike: तीन महीने वापलरेली Pulsar १८ हजारांत Splendor Plus १६ हजारांत तर CB unicorn 30 हजारांत; जाणून घ्या अधिक..

Yojana: काय आहे शरद पवार ग्रामसमृद्धी योजना? योजनेचा लाभ घेण्यासाठी असा करा अर्ज आणि मिळवा दोन लाख अनुदान..

SAUR KRUSHI PUMP YOJANA: सौर कृषी पंपासाठी राज्य सरकारकडून आता ९५ टक्के अनुदान; असा करा अर्ज..

Onion: शेतकऱ्यांनो कांदा विकण्याची गडबड करू नका; या कारणामुळे महिन्याभरातच कांदा सत्तर रुपये किलोने विकला जाणार..

Hero MotoCorp: दुचाकीस्वारांची पेट्रोलच्या खर्चातून होणार सुटका; आता Hero Splendor इलेक्ट्रिक रूपात..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.