सना खानने शेअर केला व्हिडिओ, म्हणाली आपकी तो मौत है भाई’.
अभिनेत्री सना खानने बॉलिवूड ला रामराम ठोकून इस्लामिक धर्मगुरु सोबत गेल्या काही दिवसांपूर्वी लग्न केले. लग्नानंतर अभिनेत्री सना खान ही पती मुफ्ती अनस यांच्या सोबत कश्मीर या ठिकाणी फिरायला गेली आहे. सध्या सना खान काश्मीरला असल्यामुळे ती काश्मीर मधील व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसत आहे. नुकताच सना खानने एक व्हिडिओ शेअर केला आहे. सनाने शेअर केलेला या व्हिडीओची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा झाली आहे. या व्हिडीओमध्ये ‘आपकी तो मौत है भाई’ असे सना खान बोलताना दिसत आहे.
या शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये सना खान कश्मीरमधील थंडी विषयी बोलताना पाहायला मिळत आहे. सना खान या व्हिडिओ मध्ये म्हणते आहे, ‘बाकी काही नसले तरी चालेल पण बॉस, हे नसणे म्हणजे तुमचे मरण निश्चीत आहे. काश्मीरला कडाक्याची थंडी आहे’.सना खान हिने या व्हिडीओमध्ये मुस्लिम पेहराव केलेला पाहायला मिळतो. तिने काळ्या रंगाचा बुरखा परिधान केला आहे.
काही दिवसांपूर्वी इस्लामसाठी सिनेसृष्टी सोडत असल्याचे सोशल मीडिया पोस्टद्वारे सांगितले. सना खानने घेतलेल्या या निर्णयानंतर अनेकांना धक्का बसला होता. सना खानचे व प्रसिद्ध कोरिओग्राफर मेल्विन लुईस हे दोघे रेलेशनशिप मध्ये होते. वरचे वर्ष हे दोघे सोबत होते. मात्र दिवसांपूर्वी त्या दोघांचं ब्रेकअप झालं. त्यानंतर सना खानने मेल्विन याच्यावर अनेक आरोप केले होते. त्यानंतर तिने काही दिवसांपूर्वी पोस्ट शेअर करत फिल्मइंस्ट्री सोडत असल्याचे सांगितले होते. सना खानने फिल्म इंडस्ट्री सोडण्याचे कारण म्हणजे मेल्विन लुईस हा होता. त्या दोघांच्यात झालेल्या ब्रेकअप मुळेच सना खान पूर्णपणे निराश झाली होती.
सना खानने नुकतेच २० नोव्हेंबर २०२० रोजी गुजरातचे मौलाना मुफ्ती अनसशी लग्न केले आहे. सना खानचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. सनाने सलमान खानच्या ‘बिग बॉस’च्या सहाव्या सिझनमध्ये सहभाग नोंदविला होता.
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम