NCL Recruitment 2023: या उमेदवारांना NCL इंडिया लिमिडेटमध्ये नोकरीची मोठी संधी..

0

NCL Recruitment 2023: बेरोजगारीचा दर मोठ्या प्रमाणात असला तरी आता काही विभागांमध्ये नोकरीच्या संधी देखील उपलब्ध होत आहेत. जर तुम्ही देखील नोकरीच्या शोधात असाल NCL इंडिया लिमिटेडनेमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. NCL इंडिया लिमिटेड विभागामध्ये नोकर भरती निघाली असून यासंदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना आठ जुलै 2023 पर्यंत अर्ज करता येणार आहेत. जाणून घेऊया सविस्तर.

रिक्त जागांच्या तपशील आणि शैक्षणिक पात्रता

NCL इंडिया लिमिडेटमध्ये एकूण 500 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यामध्ये औद्योगिक प्रशिक्षणार्थी या विभागांमध्ये 238 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी उमेदवारांची शैक्षणिक पात्रता जाणून घ्यायची झाल्यास, किमान तीन वर्ष कालावधी पूर्ण असलेला अभियांत्रिकी अभ्यासक्रमाचा डिप्लोमा पूर्ण असणे आवश्यक आहे.

औद्योगिक प्रशिक्षणार्थी खाणी आणि खाणी सहाय्य सेवा या विभागांमध्ये 262 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत यासाठी उमेदवाराची शैक्षणिक पात्रता जाणून घ्यायची झाल्यास, या विभागांमध्ये उमेदवार हा आयटीआय (ITI) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा आणि परीक्षा फी

NCL इंडिया लिमिडेटमध्ये भरण्यात येणाऱ्या 500 रिक्त जागांसाठी उमेदवारांची वयोमर्यादा 18 ते 37 वर्ष निश्चित करण्यात आली आहे. त्याचबरोबर एससी एसटी उमेदवारांसाठी 18 ते 40 वयोमर्यादा असणार आहे. कोणत्याही उमेदवारांना परीक्षा फी आकारली जाणार नाही.

पगार

NCL इंडिया लिमिडेटमध्ये निवड करण्यात येणाऱ्या उमेदवारांना पहिल्या वर्षी दरमहा 18 हजार रुपये तर दुसऱ्या वर्षी वीस हजार रुपये आणि तिसऱ्या वर्षी 22 हजार रुपये, असा दरमहा पगार मिळणार आहे. त्याचबरोबर औद्योगिक प्रशिक्षणार्थी खाण आणि खाण सहाय्य सेवा या उमेदवारांसाठी पहिल्या वर्षी 14 हजार रुपये, दुसऱ्या वर्षी 16, तर तिसऱ्या वर्षी 18 हजार रुपये पगार मिळेल.

निवड प्रक्रिया

NCL इंडिया लिमिडेट विभागामध्ये उमेदवारांची निवड औद्योगिक प्रशिक्षणासाठी उमेदवारांची निवड ही लेखी परीक्षेच्या आधारे केली जाणार आहे. उमेदवारांची गुणांच्या आधारानुसार गुणवत्ता निश्चित केली जाणार असून, NCL इंडिया लिमिडेट विभागामध्ये उमेदवारांची निवड केली जाईल.

असा करा अर्ज

इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 जुलै 2023 निश्चित करण्यात आली आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी सर्वप्रथम आपल्या मोबाईल मधील क्रोमवर जाऊन https://www.nlcindia.in/new_website/index.htm असं सर्च करायचं आहे. यानंतर डाव्या साईटला अर्ज करण्यासंबंधीची अपडेट पाहायला मिळेल.

हे देखील वाचा Marriage Tips: लग्नाच्या पहिल्या रात्री नवऱ्याकडून पत्नीला हव्या असतात या चार गोष्टी..

Sex Life Tips: सेक्स लाईफचा आनंद द्विगुणित करायचाय? फॉलो करा या चार गोष्टी..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.